भाजपचे मिशन बंगाल; गृहमंत्री अमित शाह अन् पक्षाध्यक्ष जेपी नड्डा अचानक बंगाल दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 03:49 PM2023-12-26T15:49:01+5:302023-12-26T15:50:08+5:30
BJP West Bengal Lok Sabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीत बंगालमधील 35+ जागा जिंकण्याचे भापचे लक्ष्य आहे.
BJP West Bengal Lok Sabha : भाजपाबद्दल असे म्हटले जाते की, हा पक्ष बारा महिने निवडणूक मोडमध्ये राहणारा पक्ष आहे. लोकसभानिवडणूक जवळ येतीये, अशा परिस्थितीत भाजपने बंगालकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह बंगाल दौऱ्यावर गेले आहेत. पक्षाचे दोन दिग्गज नेते अचानक बंगालमध्ये गेल्यामुळे अनेक तर्क लावले जात आहेत.
पक्षातील दोन दिग्गज नेते अचानक बंगालमध्ये गेल्यामुळे, भाजपचा राज्यातील 35+ जागांवर डोळा असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 42 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या. यानंतर भाजपाने बंगाल विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवली. सरकार स्थापन झाले नसले तरी भाजपने आपला जनाधार निश्चितपणे मजबूत केला.
#WATCH | West Bengal: Union Home Minister Amit Shah along with BJP national president JP Nadda visited and offered prayers at Gurudwara Bara Sikh Sangat in Kolkata on the occasion of #VeerBaalDiwaspic.twitter.com/PV2VUV8Enp
— ANI (@ANI) December 26, 2023
भाजपचे मिशन 35+
भाजपाची पश्चिम बंगालमध्ये कधीच सत्ता स्थापन झाली नाही. पण, पक्ष सातत्याने या राज्यावर लक्ष ठेवून आहे. 2014 मध्ये मोदी लाट असूनही भाजपला केवळ 2 जागा जिंकता आल्या होत्या. पण, 2019 मध्ये पक्षाने मोठी मुसंडी मारुन 18 जागा मिळवल्या. त्यामुळे आता भजपाने 2024 साठी 35+ चे लक्ष्य ठेवले आहे. यामुळेच वरिष्ठ नेत्यांचा कोलकाता दौरा सुरू झाला आहे.
संघटनेसोबत बैठका
नड्डा आणि शाह सोमवारी रात्री उशिरा कोलकाता येथे पोहोचले. आज त्यांनी गुरुद्वारा बडा शीख संगत येथे जाऊन नमन केले. त्यांनी कालीघाट मंदिरालाही भेट दिली. रात्री दिल्लीत परतण्यापूर्वी नड्डा-शाह पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, विधानसभेतील विरोधी पक्षनेते, पक्षाचे सचिव आणि निरीक्षकांची बैठक घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शाह आणि नड्डा बंगालच्या दौऱ्यावर आहेत.