भाजपा आमदाराची हत्या करणारा नक्षली ठार; होता 8 लाखांचा इनाम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 05:10 PM2019-05-02T17:10:20+5:302019-05-02T17:31:43+5:30
गेल्या महिन्यात भाजप आमदार भीमा मांडवी यांच्या वाहनांचा ताफा जात असताना नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला होता.
दंतेवाडा : छत्तीसगडच्या दंतेवाडामधील जंगलामध्ये भाजपा आमदार भीमा मांडवी यांच्यासह वाहन चालक आणि तीन जवानांची भुसुरुंग स्फोटाद्वारे हत्या करणाऱ्या नक्षलवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे.
गेल्या महिन्यात भाजप आमदार भीमा मांडवी यांच्या वाहनांचा ताफा जात असताना नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला होता. स्फोटानंतर नक्षलवाद्यांनी त्या वाहनांवर गोळीबारही केला होता. 9 एप्रिलला हा हल्ला झाला होता. या मागील सुत्रधार मुया याच्यावर 8 लाखांचे बक्षिस ठेवण्यात आले होते. गुरुवारी झालेल्या नक्षलवाद्यांवरील कारवाईमध्ये त्याला ठार करण्यात आले.
SP Dantewada: Naxal, Madvi Muyya, was one of the masterminds of the attack in which BJP MLA Bhima Mandavi&5 police personnel were killed. He was also one of the masterminds of Dantewada attack in which DD cameraman along with 2 security personnel had lost their lives last year. https://t.co/8jcakgkLO0
— ANI (@ANI) May 2, 2019
दंतेवाडाचे पोलिस अधिक्षक अभिषेक पल्लव यांनी मुया ठार झाल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की बुधवारी रात्री उशिरा जिल्हा राखीव दलाला मडकामीरास जंगलामध्ये नक्षली लपल्याची खबर मिळाली होती. यानुसार शोध घेताना नक्षल्यांशी चकमक उडाली. यामध्ये मुया मारला गेला. त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून घटनास्थळावर रायफल आणि काडतुसे मिळाली आहेत. मुया हा नक्षलवादी कारवायांमध्ये बऱ्याच काळापासून सक्रीय होता. शामगीरी हल्ल्यासह तो चोलनार येथील बॉम्बहल्ल्यात सहभागी होता. यामध्ये किरंदुल ठाण्यातील जवान शहीद झाले होते.
आ. मांडवी व भाजपचे स्थानिक नेते प्रचारासाठी जात असताना नक्षल्यांनी वाहनांपाशी स्फोट घडवून आणला. दंतेवाडा हा भाग बस्तर मतदारसंघात येतो. तिथे पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी मतदान होणार होते, त्यात बदल करण्यात आला नाही.