BJP RajyaSabha MP: भाजपचा विरोधकांना धक्का; राज्यसभेच्या चार जागांवर विजय, खासदारांचा आकडा 100च्या पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 02:27 PM2022-04-01T14:27:44+5:302022-04-01T14:29:56+5:30

पहिल्यांदाच काँग्रेसनंतर अन्य पक्षाचे राज्यसभेत 100 पेक्षा जास्त झाले खासदार आहेत.

BJP's MP's number has crossed 100 in RajyaSabha, AAP won five | BJP RajyaSabha MP: भाजपचा विरोधकांना धक्का; राज्यसभेच्या चार जागांवर विजय, खासदारांचा आकडा 100च्या पुढे

BJP RajyaSabha MP: भाजपचा विरोधकांना धक्का; राज्यसभेच्या चार जागांवर विजय, खासदारांचा आकडा 100च्या पुढे

Next

नवी दिल्ली: पहिल्यांदाच भाजपच्या राज्यसभेत 100 पेक्षा जास्त जागा झाल्या आहेत. अशी ही कामगिरी करणारा भाजप हा 1988 नंतरचा पहिला पक्ष ठरला आहे. गुरुवारी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीची फेरी पाड पडली. यानंतर राज्यसभेत भाजपच्या खासदारांचा आकडा 101 झाला आहे.

भाजपने इतक्या जागा जिंकल्या
13 पैकी 4 जागांवर विजय मिळवत भाजपने हा पराक्रम गाजवला आहे. भाजपचा सहयोगी युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (UPPL) ने असाममधून राज्यसभेची एक जागा जिंकली. असाम, त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडील तीन राज्यांमधून भाजपने राज्यसभेच्या चार जागा जिंकल्या. या भागातून भाजपने राज्यसभेतील सदस्यांची संख्याही वाढवली आहे.

असामच्या मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन 
असामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केले की, "असामने एनडीएच्या दोन उमेदवारांना राज्यसभेवर निवडून पंतप्रधानांवरील विश्वास व्यक्त केला आहे. भाजपचे पवित्रा मार्गेरिटा 11 मतांनी तर UPPL च्या रावंगवरा नरझारी 9 मतांनी विजयी झाले. विजेत्यांना माझे अभिनंदन.''

भाजपची राज्यसभेत शंभरी पार 
राज्यसभेत भाजपने 100चा आकडा पार केल्याने, या वर्षी ऑगस्टमध्ये होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीतून विरोधक बाहेर फेकले गेले आहेत. आसाममधील राज्यसभेच्या दोन आणि त्रिपुरातील एका जागेसाठी गुरुवारी मतदान झाले. नागालँडमधील एकमेव राज्यसभेच्या जागेवर भाजप उमेदवार आणि त्यांच्या महिला विंगच्या प्रदेशाध्यक्ष एस फांगनॉन कोन्याक यांची बिनविरोध निवड झाली.

'आप'चा 5 जागांवर विजय

असाममध्ये काँग्रेसचे रिपुन बोरा आणि राज्यसभेतील राणी नारा यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या विजयानंतर 'आप'ने राज्यातील पाचही जागा जिंकल्या आहेत. आता राज्यसभेत 'आप'च्या जागांची संख्या 8 झाली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या टप्प्यात काँग्रेसचे संख्याबळ पाच जागांपेक्षा कमी झाले आहे.

Web Title: BJP's MP's number has crossed 100 in RajyaSabha, AAP won five

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.