भाजपचा प्लॅन '144': लोकसभेच्या 'या' जागा जिंकण्यासाठी स्वतः पीएम मोदींनी हाती घेतली मोहिम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 08:51 PM2022-12-21T20:51:51+5:302022-12-21T20:52:36+5:30

लोकसभा निवडणुकीला अजून बराच वेळ बाकी आहे, पण भाजपने यासाठी तयारी सुरू केली आहे.

BJP's plan '144': PM Modi himself took up the campaign to win 'these' Lok Sabha seats | भाजपचा प्लॅन '144': लोकसभेच्या 'या' जागा जिंकण्यासाठी स्वतः पीएम मोदींनी हाती घेतली मोहिम

भाजपचा प्लॅन '144': लोकसभेच्या 'या' जागा जिंकण्यासाठी स्वतः पीएम मोदींनी हाती घेतली मोहिम

googlenewsNext


नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीला अजून बराच वेळ बाकी आहे, पण भाजपने यासाठी तयारी सुरू केली आहे. भाजपने देशातील त्या 144 लोकसभा जागांसाठी विशेष रणनीती आखली आहे, जिथे मोदी लाट असूनही 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. या जागा जिंकण्यासाठी पक्षाने पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची ड्युटी लावली आहे.

स्वतः मोदी 40 सभा घेणार
हिंदी पट्ट्यातील यूपी-बिहार व्यतिरिक्त, पक्षाने तेलंगणा आणि ओडिशाच्या लोकसभा जागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपने 303 जागा जिंकल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने मिशन 2024 साठी 350 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 40 जागांवर मेगा रॅली करणार आहेत. क्लस्टर प्रभारींना या रॅलींचे आयोजन करावे लागते. उर्वरित 104 जागांवर अमित शहा आणि जेपी नड्डा सभा घेणार आहेत.

144 जागा जिंकण्याची रणनीती काय?
भाजपने 40 मंत्र्यांची स्वतंत्र टीम तयार केली असून त्याला क्लस्टर प्रभारी असे नाव देण्यात आले आहे. प्रत्येक मंत्र्याला लोकसभेच्या 2-3 जागा देण्यात आल्या आहेत. मंत्र्यांना राज्यसभेच्या खासदारांसह त्यांच्या जबाबदारीच्या लोकसभा मतदारसंघात जावे लागेल.
मंत्र्यांची टीम भौगोलिक, आर्थिक, सामाजिक आणि जातीय समीकरणाची ब्लू प्रिंट तयार करेल. मतदारसंघातील संभाव्य उमेदवार ओळखण्याचे कामही देण्यात आले आहे.

त्या हॉट सीटवर लक्ष ठेवणार
144 जागांमध्ये देशातील काही हॉट सीट्सचाही समावेश आहे, जिथे भाजपला कधीही विजय मिळवता आलेला नाही. यामध्ये उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि मैनपुरी, महाराष्ट्रातील बारामती, पश्चिम बंगालमधील यादवपूर, तेलंगणातील मेहबूब नगर आणि मध्य प्रदेशातील छिंदवाडा यांचा समावेश आहे.

Web Title: BJP's plan '144': PM Modi himself took up the campaign to win 'these' Lok Sabha seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.