भाजपाचे राज्यसभा खासदार हरद्वार दुबे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 09:18 AM2023-06-26T09:18:08+5:302023-06-26T09:18:34+5:30

कॅन्टोन्मेंटचे दोन वेळा आमदार आणि माजी राज्यमंत्री हरिद्वार दुबे 2020 मध्ये राज्यसभा सदस्य बनले होते.

BJP's Rajya Sabha MP Hardwar Dubey passed away | भाजपाचे राज्यसभा खासदार हरद्वार दुबे यांचे निधन

भाजपाचे राज्यसभा खासदार हरद्वार दुबे यांचे निधन

googlenewsNext

भाजपाचेराज्यसभा खासदार हरद्वार दुबे यांचे सोमवारी पहाटे फोर्टिस हॉस्पिटलमध्ये निधन झाले. रात्री उशीरा तब्येत बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज दुपारपर्यंत त्यांचे पार्थिव आग्रा येथे आणले जाणार आहे. 

रविवारी ते बरे होते. अचानक रात्री त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. यामुळे त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आहे. उपचारावेळी त्यांची प्राणज्योत मालवली, असे त्याचा मुलगा प्रांशु दुबे यांनी सांगितले. 

कॅन्टोन्मेंटचे दोन वेळा आमदार आणि माजी राज्यमंत्री हरिद्वार दुबे 2020 मध्ये राज्यसभा सदस्य बनले होते. कल्याण सिंह सरकारमध्ये ते अर्थ राज्यमंत्री होते. 1969 मध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे संघटन मंत्री म्हणून आग्रा येथे आले. तेव्हापासून ते येथील राजकारणात सक्रिय होते. 

1989 मध्ये त्यांनी कॅन्टोन्मेंटमधून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर 1991 मध्येही जिंकले. यावेळी त्यांच्या गळ्या वित्त राज्यमंत्रीपदाची माळ पडली होती. 2005 मध्ये त्यांनी खेरागड विधानसभेची पोटनिवडणूक लढवली होती, ज्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 2011 मध्ये प्रदेश प्रवक्ते आणि 2013 मध्ये प्रदेश उपाध्यक्ष अशी भाजपात पदे भूषविली होती. 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: BJP's Rajya Sabha MP Hardwar Dubey passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.