विरोधकांना धूळ चारण्यासाठी भाजपचा सिक्रेट प्लॅन तयार, देशभरातील प्रमुख नेत्यांवर लक्ष; २०२४च्या लोकसभेसाठी तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 10:58 AM2023-03-23T10:58:40+5:302023-03-23T11:00:08+5:30

२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत हार पत्करावी लागलेल्या १६५ लोकसभा मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे.

BJP's secret plan to destroy opposition, focus on prominent leaders across the country; Preparations for 2024 Lok Sabha are underway | विरोधकांना धूळ चारण्यासाठी भाजपचा सिक्रेट प्लॅन तयार, देशभरातील प्रमुख नेत्यांवर लक्ष; २०२४च्या लोकसभेसाठी तयारी सुरू

विरोधकांना धूळ चारण्यासाठी भाजपचा सिक्रेट प्लॅन तयार, देशभरातील प्रमुख नेत्यांवर लक्ष; २०२४च्या लोकसभेसाठी तयारी सुरू

googlenewsNext

-हरिश गुप्ता

नवी दिल्ली : २०२४च्या लोकसभा निवडणुकांत देशातील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा पराभव करण्यासाठी भाजपने एक  योजना आखली आहे. या निवडणुकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला हरविण्यासाठी विरोधी पक्षांमध्ये आघाडी करण्याबाबत अद्याप एकमत झालेले नाही. मात्र भाजपने मात्र आपल्या विजयासाठी जोरदार पूर्वतयारी सुरू केली आहे. 

२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत हार पत्करावी लागलेल्या १६५ लोकसभा मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. मात्र विरोधी पक्षांतील प्रमुख नेत्यांचा पराभव करण्यासाठी लोकसभेच्या निवडक २० जागांवर विशेष लक्ष देण्यात येईल. या मतदारसंघांची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व त्यांच्या कुटुंबीयांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. बारामती मतदारसंघातून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे लोकसभेवर निवडून आल्या आहेत. या लोकसभा मतदारसंघात भाजपची कामगिरी उंचावण्यासाठी निर्मला सीतारामन यांनी काही कालावधीच्या अंतराने दोन ते तीन दिवस मुक्काम करावा व पक्षकार्याचा विस्तार करावा असे ठरविण्यात आले आहे.

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी मोठी तयारी केली असून, यासाठी राम मंदिर आणि हिंदुत्त्वाचा मुद्दा प्रचारासाठी घेण्यात येणार आहे. अयोध्येतील राम मंदिराचे बांधकामही लवकरच पूर्ण होणार असून, त्याचा भाजपला फायदा होण्याची 
शक्यता आहे.

सोनिया गांधी, राहुल अन् प्रियांका यांना रोखणार..
अमेठी मतदारसंघात २०१९ साली काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा केंद्रीय महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांनी पराभव केला. त्यानंतर आता भाजपचे रायबरेली मतदारसंघाकडे लक्ष लागले आहे. 
या मतदारसंघातून सोनिया गांधी कदाचित आगामी लोकसभा निवडणूक न लढविता त्यांच्याऐवजी तिथे प्रियांका गांधी रिंगणात उतरण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यांना रोखण्यासाठी खास प्लॅन तयार केला जात आहे. 

लोकसभा निवडणुकांत रायबरेली मतदारसंघात काँग्रेसच्या माजी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचा पराभव होण्याच्या दृष्टीने या मतदारसंघाची जबाबदारी कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यावर सोपविली आहे. 

कशी आहे व्यूहरचना
मध्य प्रदेशमधील छिंदवाडा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना देण्यात आली आहे. या जागेवर कमलनाथ यांचा पराभव करण्यासाठी व्यूहरचना करण्यात येणार आहे. 
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे मध्यंतरी तामिळनाडू, केरळच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांच्यावरही भाजपने काही राजकीय कामगिरी सोपविण्यात आल्याची चर्चा आहे. १९८४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत राजीव गांधी यांनीदेखील अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह अन्य विरोधी पक्षनेत्यांविरोधात सबळ उमेदवार उभे केले होते.

Web Title: BJP's secret plan to destroy opposition, focus on prominent leaders across the country; Preparations for 2024 Lok Sabha are underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा