भाजपाचे ज्येष्ठ नेते येडियुरप्पा बालंबाल बचावले, पायलटच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 14:13 IST2023-03-06T14:12:58+5:302023-03-06T14:13:44+5:30
B.S. Yeddyurappa : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा हे हेलिकॉप्टर दुर्घटनेत बालंबाल बचावले. कलबुर्गी गिल्ह्यातील एका ठिकाणी ते प्रवास करत असलेलं हेलिकॉप्टर उतरणार होतं. मात्र त्याचवेळी ते पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघातग्रस्त होण्यापासून बचावलं.

भाजपाचे ज्येष्ठ नेते येडियुरप्पा बालंबाल बचावले, पायलटच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा अपघात
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा हे हेलिकॉप्टर दुर्घटनेत बालंबाल बचावले. कलबुर्गी गिल्ह्यातील एका ठिकाणी ते प्रवास करत असलेलं हेलिकॉप्टर उतरणार होतं. मात्र त्याचवेळी ते पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघातग्रस्त होण्यापासून बचावलं. त्यानंतर हे हेलिकॉप्टर जमिनीवर उतरण्यापूर्वी पुन्हा हवेत झेपावले.
जेव्हा कलबुर्गीमध्ये बीएस येडियुरप्पा यांचं हेलिकॉप्टर लँड करत होतं. तेव्हाच हेलिकॉप्टरच्या वेगाने फिरणाऱ्या पंख्यांमुळे धुराचं एक वादळ आलं, त्यामुळे पायलटांना ऐनवेळी लँडिंग टाळावी लागली. त्यानंतर हेलिकॉप्टर जमिनीवर उतरण्यापूर्वी पुन्हा एकदा आकाशात उडाले.
बी. एस. येडियुरप्पा हे निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी कर्नाटकच्या वेगवेगळ्या भागात फिरत आहेत. तसेच ते सोमवारी कलबुर्गी येथे आले होते. मात्र प्रशासनाच्या चुकीमुळे हेलिकॉप्टर लँडिंग होताना मोठा अपघात टळला. हेलिकॉप्टरच्या पंख्यांच्या वेगवान हवेमुळे शेजारील झोपड्यांवरील प्लॅस्टिक आणि आजूबाजूच्या कचऱ्याच्या ढिकाऱ्यातील कचरा वेगाने वर उडू लागला. त्यामुळे मोठा अपघात झाला असता. मात्र पायलटने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर पुन्हा वरच्या दिशेला नेले. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूची जागा स्वच्छ करून घेतली. त्यानंतरच हेलिकॉप्टर खाली उतरू शकले.