स्थायीत भाजपाची मुस्कटदाबी सदस्यांचा आरोप : सत्ताधार्यांचा केला निषेध; सभेत बोलण्यावरून खडाजंगी
By admin | Published: May 6, 2016 10:11 PM2016-05-06T22:11:31+5:302016-05-06T22:11:31+5:30
जळगाव : स्थायी समितीच्या सभेत बोलण्यास सत्ताधार्यांकडून भाजपाची मुस्कटदाबी होत असून भाजपाच्या सदस्यांना बोलूच दिले जात नसल्याचा आरोप माजी स्थायी समिती सभापती ज्योती चव्हाण व सदस्यांनी सभेत केला. तसेच सभा संपल्यावर पत्रकारांशी बोलताना सत्ताधार्यांच्या या भूमिकेचा त्यांनी निषेधही केला. सभेत ज्योती चव्हाण, पृथ्वीराज सोनवणे व खाविआचे गटनेते गणेश सोनवणे यांच्यात या विषयावरून शाब्दिक चकमकही झाली.
Next
ज गाव : स्थायी समितीच्या सभेत बोलण्यास सत्ताधार्यांकडून भाजपाची मुस्कटदाबी होत असून भाजपाच्या सदस्यांना बोलूच दिले जात नसल्याचा आरोप माजी स्थायी समिती सभापती ज्योती चव्हाण व सदस्यांनी सभेत केला. तसेच सभा संपल्यावर पत्रकारांशी बोलताना सत्ताधार्यांच्या या भूमिकेचा त्यांनी निषेधही केला. सभेत ज्योती चव्हाण, पृथ्वीराज सोनवणे व खाविआचे गटनेते गणेश सोनवणे यांच्यात या विषयावरून शाब्दिक चकमकही झाली.मनपातील जन्म-मृत्यू विभागामध्ये संगणकाचे ज्ञान असलेले व संगणकाद्वारे दाखले तयार करण्यासाठी तुळशीराम राठोड यास मानधनावर नियुक्ती देण्याबाबतच्या प्रशासनाच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना भाजपाच्या ज्योती चव्हाण यांनी लेखापरीक्षकांनी या प्रस्तावाची टिपणी चांगली लिहिली असल्याचे सांगितले. मात्र तरीही विषयाला मात्र भाजपाचा विरोध असल्याचे सांगत विषय बहुमताने घेण्याची सूचना केलीे. तर पृथ्वीराज सोनवणे यांनी त्यांच्या प्रभागात व्हॉल्वमन म्हणून अनेक वर्षांपासून काम करणार्या व्यक्तीसही मनपाने मानधनावर घ्यावे अशी मागणी केली. मात्र पाणीपुरवठ्यात भरपूर कर्मचारी असल्याने हा विषय घेता येणार नाही, असे सभापतींनी स्पष्ट केले. मात्र भाजपाकडून त्याच विषयावर मत मांडण्याचा प्रयत्न झाल्याने खाविआचे गटनेते गणेश सोनवणे यांनी विषय बहुमताने मंजूर झाल्यावर त्याबाबत मत मांडण्याचा विषयच येत नाही. तसेच लेखापरीक्षकांनी कर्मचारी अधिक असल्याचे स्पष्ट लिहिले आहे. मग हा विषय मांडण्यापूर्वी अभियंता, उपायुक्त, आयुक्त अथवा स्थायी समिती सभापतींशी चर्चा करायला हवी होती. त्यावर पृथ्वराज सोनवणे यांनी तुमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे विषय मंजूर करायचा की नाही हा तुमचा प्रश्न आहे. पाण्याची समस्या निर्माण व्हायला नको, असे बजावले. तर ज्योती चव्हाण यांनी आम्हाला कोणाशी चर्चा करायची गरज नाही. तुम्ही असे सांगितलेच कसे? असा सवाल केला. त्यामुळे त्यांच्यात व गणेश सोनवणे यांच्यात थोडी शाब्दिक चकमक झाली. त्यानंतरही आयत्यावेळेत दूध केंद्रास मंजुरीचा विषय सत्ताधार्यांनी मंजूर केला. मात्र पृथ्वीराज सोनवणे यांनी आयत्यावेळेचा विषय मांडण्याचा प्रयत्न करताच ही महासभा नाही, असे सांगत सभा संपल्याचे जाहीर केले. -------भाजपा नेत्याच्या नातलगाच्या दूधकेंद्रास मंजुरीमनपाकडून गेल्या चार-पाच वर्षांपासून दूध केंद्रांच्या प्रस्तावांना मंजुरी देणे बंद करण्यात आले होते. मात्र भाजपातील एका नेत्याच्या नातलगाच्या मिनाक्षी संजय पाटील यांच्या दूधकेंद्राच्या प्रस्तावास मंजुरी देण्याचा विषय सत्ताधार्यांनी स्थायी समिती सभेत तातडीने मंजूर केला. विशेष म्हणजे भाजपाच्याच सदस्यांनी त्यास विरोध दर्शविला. सभापतींनी भाजपाच्याच माणसाचा प्रस्ताव आहे. एकमताने मंजूर करायचा की विरोध आहे? अशी विचारणाही केली. त्यावर भाजपाच्या सदस्यांनी विरोध दर्शवित बहुमताने घ्या, अशी भूमिका घेतली. -------सत्ताधार्यांचा निषेधसभा आटोपल्यावर ज्योती चव्हाण, पृथ्वीराज सोनवणे व सदस्यांनी सत्ताधार्यांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. सर्व पक्ष एकत्र आल्याने भाजपाला बोलू दिले जात नसल्याचा आरोप करीत सत्ताधार्यांचा निषेध केला.