पोटनिवडणुकीत भाजपची दमदार कामगिरी, काँग्रेसचा कर्नाटकमध्ये विजय
By admin | Published: April 13, 2017 06:02 PM2017-04-13T18:02:08+5:302017-04-13T18:02:08+5:30
फक्त दिल्लीमध्येच नव्हे हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम आणि राजस्थान या राज्यातही भाजपाने विधानसभा पोटनिवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - फक्त दिल्लीमध्येच नव्हे हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम आणि राजस्थान या राज्यातही भाजपाने विधानसभा पोटनिवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे. भाजपाने विधानसभेच्या सहापैकी पाच जागा जिंकल्या. काँग्रेसला तीन जागा मिळाल्या तर, आम आदमी पक्षाला पोटनिवडणुकीत सर्वात जास्त फटका बसला.
पक्षाची पकड असलेल्या दिल्लीमध्ये राजौरी विधानसभा मतदारसंघात भाजपा-शिरोमणी अकाली दलाचे उमेदवार मनजींदर सिंग सीरसा यांनी 14,652 मतांनी विजय मिळवला. आपच्या उमेदवारावर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवली. भाजपाच्या या दमदार कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुशासन आणि विकासाच्या राजकारणाला साथ दिल्याबद्दल मतदार राजाचे आभार मानले.
कर्नाटकमध्ये काँग्रेसने चांगली कामगिरी करत दोन जागांवर विजय मिळवला. ननजानगुडमध्ये काँग्रेसच्या कालाली एन केशवमूर्ती यांनी 21 हजार मतांच्या फरकाने भाजपाच्या श्रीनिवास प्रसाद यांच्यावर विजय मिळवला. गुंडलूपेटमध्ये काँग्रेसच्या गीथा महादेवप्रसाद यांनी विजय मिळवला. मध्यप्रदेशात भाजपाने बांधवगडची जागा कायम राखली. 25 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला.
उमारीयाची जागाही भाजपाने जिंकली. हिमाचलप्रदेशमध्ये भाजपा उमेदवार डॉ. अनिल धीमान यांनी विजय मिळवला. या विजयाने 68 सदस्यांच्या विधानसभेत भाजपाचे संख्याबळ 28 झाले आहे. राजस्थानच्या ढोलपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या शोभा राणी कुशवाह यांनी सहज विजय मिळवला.