उपसभापतीपदाच्या निवडणुकीस नवे वळण?, भाजपाचा पाठिंबा बीजेडीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 05:28 AM2018-06-29T05:28:21+5:302018-06-29T05:28:23+5:30

राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीने नवे राजकीय वळण घेतले आहे. काँग्रेसने तृणमूलचे नेते सुखेंदु शेखर रॉय यांना आॅफर दिली आहे, तर भाजपाने बिजू जनता दलाच्या पारड्यात आपले वजन टाकले आहे.

BJP's support to BJD's new turnaround? | उपसभापतीपदाच्या निवडणुकीस नवे वळण?, भाजपाचा पाठिंबा बीजेडीला

उपसभापतीपदाच्या निवडणुकीस नवे वळण?, भाजपाचा पाठिंबा बीजेडीला

Next

हरीश गुप्ता
नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीने नवे राजकीय वळण घेतले आहे. काँग्रेसने तृणमूलचे नेते सुखेंदु शेखर रॉय यांना आॅफर दिली आहे, तर भाजपाने बिजू जनता दलाच्या पारड्यात आपले वजन टाकले आहे.
ही निवडणूक टाळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपाने २४१ सदस्य असलेल्या सभागृहात बिजू जनता दलाला आॅफर दिली आहे. शरद यादव अपात्र ठरल्यामुळे एक जागा रिक्त आहे. राष्ट्रपतींनी तीन रिक्त जागी सदस्य नेमतेले नाहीत. नियुक्त सदस्यांसह भाजपा ११२ पर्यंत पोहचू शकतो. पण शिवसेनेच्या ३ व विभाजित अद्रमुकच्या १३ सदस्यांबाबत भाजपाला खात्री नाही. मुख्यमंत्री नवीन पटनायक हे तेलुगु देसमचे ६ व तटस्थ पक्षांचे सदस्य एकत्र करण्यात यशस्वी होतील, असे भाजपाला वाटत आहे..
काँग्रेसला वाटते की, तृणमूल आपला उमेदवार रिंगणात उतरवेल. सभागृहात यूपीएचे ९२ सदस्य असून, तृणमूल सहभागी झाल्यास संख्या १०५ वर जाईल. आपचे ३, आयएनएलडीचा १ व १ अपक्ष सदस्य सोबत आले तर ही संख्या ११० होते. टीडीपी, टीआरएस व वायएसआर काँग्रेस हे विरोधकांसोबत जातील असा अंदाज आहे. अहमद पटेल यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी याबाबत चर्चा केल्याचे कळते. सुखेंदु शेखर रॉय यांच्या उमेदवारीला बॅनर्जी तयार झाल्यास राजकीय लढाईला वेगळे वळण मिळेल. मात्र सुखेंदु रॉय यांचे नाव निश्चित झाल्याच्या वृत्ताला तृणमूलने नकार दिला आहे. डावे पक्षही तृणमूलच्या उमेदवारास विरोध करत आहेत.

सन १९९२ च्या घडामोडींकडे पाहिल्यास, तेव्हा नजमा हेपतुल्ला काँग्रेसतर्फे उपसभापतीपदाची निवडणूक लढवत होत्या. विरोधकांच्या उमेदवार रेणुका चौधरी तेव्हा पराभूत झाल्या होत्या. आता नजमा हेपतुल्ला भाजपमध्ये आहेत, तर रेणुका चौधरी यांनीही पक्षांतर केले.

निरोप समारंभ महत्त्वाचा
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे उपसभापती पी. के. कुरियन यांच्यासाठी निरोप समारंभ आयोजित करणार असून, तेव्हा कदाचित राजकीय चित्र अधिक स्पष्ट होईल.

Web Title: BJP's support to BJD's new turnaround?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.