महिलेच्या खुनातील आरोपी मोदींच्या मंचावर, भाजपाकडून विधानसभेचं तिकीट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 03:44 PM2019-12-04T15:44:49+5:302019-12-04T15:45:42+5:30
शशिभूषण मेहता यांनी मोदींच्या सभेला उपस्थिती लावत चक्क स्टेजवर एन्ट्री केली.
रांची - झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी नेते आणि सध्या भाजपावासी असलेले डॉ. शशिभूषण मेहता यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत व्यासपीठावर स्थान मिळाले. शशिभूषण मेहता यांच्यावर खूनाचा आरोप असून ते सध्या जामीनावर आहेत. मात्र, महिला शिक्षिकेच्या खुनात आरोपी असलेल्या शशिभूषण मेहता यांना भाजपाने झारखंड विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे, ते आज चक्क पंतप्रधान मोदींच्या स्टेजवर दिसले.
शशिभूषण मेहता यांनी मोदींच्या सभेला उपस्थिती लावत चक्क स्टेजवर एन्ट्री केली. त्यानंतर, मोदींसोबत स्टेजवर एका खुनातील आरोपीला स्थान मिळतंय, असे म्हणत त्यांचा फोटो तेथील सोशल मीडियात व्हायरल होत आहे. भाजपाने शशिभूषण यांना पंकी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. मेहता यांच्यावर खुनाच आरोप असून 2012 मध्ये ही घटना घडली आहे.
मेहता हे ऑक्सफर्ड पल्बिक स्कुलचे संचालक असून 2012 मध्ये त्यांना शाळेतील शिक्षिकेच्या मर्डरप्रकरणी अटक करण्यात आली होती. स्कुल वार्डन सुचित्रा मिश्रा यांचा खून केल्याचा आरोप मेहता यांच्यावर आहे. ध्रुवा येथी गांधीआश्रम जवळील रोडलगतच सुचित्रा यांचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजपाने मेहता यांना भाजपात प्रवेश दिल्यानंतरही सुचित्रा मिश्रा यांच्या कुटुबीयांना आणइ नातेवाईकांनी आंदोलन करुन या घटनेचा निषेध नोंदवला होता.