विजयासाठी भाजपाचा त्रिसूत्री फॉर्म्युला, विरोधकांची हवा काढणार; पेज प्रमुख, शक्ती केंद्र व कार्पेट बॉम्बिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 01:53 AM2017-11-28T01:53:13+5:302017-11-28T01:53:27+5:30
गुजरात विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने जोरदार रणनीती आखली आहे. पक्षाने पेजप्रमुख, शक्ती केंद्र व कार्पेट बाँम्बिग अशी त्रिसूत्री त्यासाठी तयार केली आहे.
- नंदकिशोर पुरोहित
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने जोरदार रणनीती आखली आहे. पक्षाने पेजप्रमुख, शक्ती केंद्र व कार्पेट बाँम्बिग अशी त्रिसूत्री त्यासाठी तयार केली आहे.
गांधीनगरच्या सीमेवर असलेल्या ‘कमलम’ या प्रदेश मुख्यालयातून त्यावर लक्ष ठेवले जात आहे. आम्ही तयार केलेली ही रणनीती आम्हाला विजय मिळवून देईल. काँग्रेस व अन्य विरोधी पक्ष आमच्या विजयात अडथळा आणू शकत नाहीत, असे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे.
विधानसभेच्या प्रत्येक जागेसाठी मतदानासाठी केंद्रावर येणाºया मतदारांच्या यादीचे पान पक्षाने पदाधिकारी व संबंधित कार्यकर्त्याला दिले आहे. एका बूथवर येणाºया ८00 ते ९00 मतदारांची जबाबदारी या पदाधिकारी व कार्यकर्त्यावर असेल. हे कार्यकर्तेच मतदारांना केंद्रांपर्यंत पोहोचवतील.
पेज प्रमुखांचे चार ते पाच बूथ मिळून शक्ती केंद्र असेल. पेजप्रमुख नीट काम करत असल्याचे पाहण्याचे काम शक्ती केंद्र करेल. या पद्धतीने प्रत्येक मतदारसंघातील १00 ूबूथद्वारे आपला विजय निश्चित करण्याचे काम याप्रकारे केले जाईल.
गुजरात गौरव संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पेजप्रमुखांना या कामाचे महत्त्व पटवून दिले होते. त्यानंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पेजप्रमुखांची बैठक घेऊ न त्यांना या कामाचे गांभीर्य सांगितले. दिवाळीत या गौरव संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय प्रत्यके मतदारसंघातील ५00हून अधिक प्रमुख नागरिकांची बैठक घेऊ न, त्यांच्याकडे पाठिंबा मागितला.
प्रदेश भाजपचे प्रवक्ते डॉ. जगदीश भावसार म्हणाले की, काँग्रेसने नरेंद्र मोदी यांना ‘चायवाला’ म्हणून ज्यागप्रकारे हिणवले, त्याचे उत्तर आम्ही ‘मन की बात, चाय के साथ’ मधून रविवारी दिले आहे. उमेदवारी अर्ज भरताना भाजपचे समर्थक ज्याप्रकारे गर्दी करीत आहेत, ते पाहता २२ वर्षांनंतरही गुजरातची जनता आम्हालाच विजयी करेल, हे स्पष्ट झाले आहे.
क्या है कार्पेट बॉम्बिंग
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात नरेंद्र मोदी यांच्या सभा होणार आहेत. त्यांच्या सभा आज, सोमवारपासून सुरू झाल्या असून, ते २९ नोव्हेंबर रोजी ४ सभांत भाषणे करणार आहेत. पक्षाने मोदी यांच्या सभांना ‘कार्पेट बॉम्बिंग’ नाव दिले असून, त्याद्वारे विरोधी पक्ष व त्यांचा प्रचार संपवून टाकला जाईल.