अल्पसंख्याकबहुल मतदारसंघांतही भाजपचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 04:31 AM2019-05-30T04:31:02+5:302019-05-30T04:31:11+5:30

अल्पसंख्यांक लोकसंख्या अधिक असलेल्या ज्या ९० जिल्ह्यांची २००८ साली वर्गवारी करण्यात आली होती, त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक जागांवर विजय मिळवून भाजपने आपण अल्पसंख्याकविरोधी असल्याच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

BJP's victory in minority-dominated constituencies | अल्पसंख्याकबहुल मतदारसंघांतही भाजपचा विजय

अल्पसंख्याकबहुल मतदारसंघांतही भाजपचा विजय

Next

नवी दिल्ली : अल्पसंख्यांक लोकसंख्या अधिक असलेल्या ज्या ९० जिल्ह्यांची २००८ साली वर्गवारी करण्यात आली होती, त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक जागांवर विजय मिळवून भाजपने आपण अल्पसंख्याकविरोधी असल्याच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
अशा ७९ लोकसभा जागांपैकी भाजपने ४१ जागांवर विजय मिळविला आहे. काँग्रेसला इथे फक्त सहा जागा जिंकता आल्या. गेल्या निवडणुकांत काँग्रेसने १२ जागा जिंकल्या होत्या. एका विश्लेषकाने सांगितले की, यंदाच्या मुस्लीम मतदारांनी एकगठ्ठा मतदान केलेले नाही. यंदा २७ मुस्लीम उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, भाजपच्या सहाही मुस्लीम उमेदवारांचा पराभव झाला. तृणमूल काँग्रेस (५), काँग्रेस (४), सप-बसप, नॅशनल कॉन्फरन्स व मुस्लीम लिग (प्रत्येकी ३), एमआयएम (२), एलआयपी, माकप, एआययूडीएफ (प्रत्येकी १) यांचा विजयी मुस्लीम खासदार आहेत.
अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी फारसे काही न केल्याचा व त्यांच्यावर हल्ले चढविले जात असल्याचा आरोप विरोधकांनी भाजपवर केला होता.
>यूपी, बंगालमध्ये यश : पश्चिम बंगालमध्ये अल्पसंख्यांकबहुल जिल्ह्यांत १८ लोकसभेच्या जागा आहेत. तिथे भाजपला चांगले यश मिळाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुस्लीमबहुल असलेल्या रामपूर, नगिना, मोरादाबाद, संभल, अमरोहा जिल्ह्यांमध्येही भाजपने लक्षणीय यश मिळविले आहे. या राज्यात काँग्रेसचे सहाही मुस्लीम उमेदवार पराभूत झाले. उत्तर प्रदेशातील लोकसंख्येत मुस्लिमांचे प्रमाण २० टक्के आहे.

Web Title: BJP's victory in minority-dominated constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा