भाजपाच्या विजयाने मुस्लिम राजकारणास हादरा- सिंघल
By Admin | Published: July 18, 2014 01:41 AM2014-07-18T01:41:12+5:302014-07-18T01:41:12+5:30
स्लिमांच्या समर्थनाविना निवडणुका जिंकता येतात हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले आहे.
नवी दिल्ली : मुस्लिमांच्या समर्थनाविना निवडणुका जिंकता येतात हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले आहे. मुस्लिम समुदायाने हिंदूंच्या भावनांचा आदर करायला शिकण्याची हीच योग्य वेळ आहे, असे विहिंपचे नेते अशोक सिंघल यांनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदी हे आदर्श स्वयंसेवक आहेत. यापूर्वीच्या रालोआ सरकारने हिंदुत्वाच्या अजेंड्याबाबत जे केले तसे ते करणार नाहीत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. ८८ वर्षीय सिंघल हे विहिंप आणि रा.स्व. संघाचे सर्वात ज्येष्ठ नेते मानले जातात. विदेशी शक्ती आणि फुटीरवादी शक्तींनी हिंदुत्वाची ओळख मिटविण्यासाठी मुस्लिम राजकारण खेळले. आता या राजकारणाला हादरा बसला आहे. आता त्यांनी धडा घेण्याची वेळ आली आहे. मुस्लिमांना सामान्य नागरिक म्हणून वागणूक दिली जाईल. त्यापेक्षा जास्त किंवा कमी नसेल. त्यांनी हिंदूंचा आदर करणे शिकायलाच हवे. त्यांनी हिंदूंना विरोध केल्यास ते किती काळ तग धरू शकतील, असा सवालही त्यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)