१०० वेळा हल्ले झाले, तरी आंदोलन, महापंचायत थांबणार नाही; राकेश टिकैत यांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 10:38 AM2021-04-04T10:38:03+5:302021-04-04T10:40:12+5:30

rakesh tikait: १०० वेळा हल्ले झाले, तरी नियोजित कार्यक्रम थांबणार नाही, असा एल्गार राकेश टिकैत यांनी केला आहे.

bku rakesh tikait says if there many times attacks mahapanchayat will not stop | १०० वेळा हल्ले झाले, तरी आंदोलन, महापंचायत थांबणार नाही; राकेश टिकैत यांचा एल्गार

१०० वेळा हल्ले झाले, तरी आंदोलन, महापंचायत थांबणार नाही; राकेश टिकैत यांचा एल्गार

Next
ठळक मुद्देराकेश टिकैत यांचा पुन्हा एकदा केंद्राला थेट इशाराकितीही हल्ले झाले, तरी महापंचायत थांबणार नाहीराजस्थानमधील अलवरमध्ये झाला होता हल्ला

अलीगड: वादग्रस्त तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या गाझिपूर, सिंघू आणि टिकरी सीमांवर हजारो शेतकरी गेल्या गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांकडून तिन्ही कायद्यांना कडाडून विरोध केला जात आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या गाडीवर राजस्थानमध्ये हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर १०० वेळा हल्ले झाले, तरी नियोजित कार्यक्रम थांबणार नाही, असा एल्गार राकेश टिकैत यांनी केला आहे. (rakesh tikait react after attack in rajasthan)

राजस्थान येथील अलवर येथे किसान महापंचायतला संबोधित करायला जात असताना राकेश टिकैत यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना राकेश टिकैत म्हणाले की, १०० वेळा हल्ले झाले, तरी नियोजित कार्यक्रमात कोणताही बदल करणार नाही. महापंचायत थांबणार नाही, त्या होतच राहणार, एवढेच नाही तर, शेतकरी आंदोलनही थांबणार नाही, असा एल्गार टिकैत यांनी केला. राजस्थाननंतर बिहार, उत्तर प्रदेश, वाराणसी आणि हिमाचल प्रदेश येथील किसान महापंचायतीत सहभागी होण्यासाठी राकेश टिकैत जाणार आहेत. 

केवळ 'या' दोनच शब्दांत केंद्रीय निवडणूक आयोगावर राहुल गांधीची टीका

भाजपवर हल्ल्याचा आरोप

अलवर जिल्ह्यातील तातरपूर चौकात राकेश टिकैत यांची गाडी थांबवून हल्ला करण्यात आला. यावेळी टिकैत यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या हल्ल्यात गाडीच्या काचाही फुटल्या होत्या. यानंतर ट्विट करत राकेश टिकैत यांनी हा हल्ला भाजप आणि ABVP ने केल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी  ABVP शी निगडीत काही जणांना अटक करण्यात आली.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) हल्ल्याची शिकवण देतो, तर अहिंसात्मक सत्याग्रह शेतकऱ्यांना निर्भय बनवितो, असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. RSS चा एकजुटीने मुकाबला करून तीन कृषी कायदे केंद्रातील मोदी सरकारला रद्द करायला भाग पाडू, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: bku rakesh tikait says if there many times attacks mahapanchayat will not stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.