बेळगावमध्ये ‘काळा दिवस’

By Admin | Published: November 1, 2014 12:31 AM2014-11-01T00:31:44+5:302014-11-01T00:31:44+5:30

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शनिवारी कडकडीत बंद पाळून काळा दिन पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Black Day in Belgaum | बेळगावमध्ये ‘काळा दिवस’

बेळगावमध्ये ‘काळा दिवस’

googlenewsNext
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शनिवारी कडकडीत बंद पाळून काळा दिन पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता धर्मवीर संभाजी उद्यान येथून मूक सायकलफेरी काढण्यात येणार आहे.
  शहरातील अनेक मार्गावर फिरून सायकल फेरीची सांगता रेल्वे ओव्हरब्रिजजवळील मराठा मंदिर येथे होणार आहे. सायकल फेरीत मराठी भाषिकांनी काळे कपडे परिधान करून हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार  संभाजी पाटील यांनी केले आहे. 
कानडी दंडेली विरोधात मराठी जनांनी संताप व्यक्त केला आहे. राज्योत्सव तसेच काळ्यादिनाच्या सायकलफेरीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बाहेरच्या जिलतील अधिकारी आणि पोलिसांना बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले आहे. तसेच  पोलीस खात्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून, शांतताभंग करणा:यांची गय केली जाणार नाही, असा इशारा उत्तर विभागाचे आयजीपी भास्कर राव यांनी दिला आहे . (प्रतिनिधी) 
 
बेळगावीची अधिकृत घोषणा आज 
च्बेळगाव शहराचे नामांतर बेळगावी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्नालयाने परवानगी दिल्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्नी सिद्धरामय्या बेळगाव शहराचे नामकरण बेळगावी झाले असल्याची औपचारिक  घोषणा करणार आहेत. बेळगावसह बंगलोरचे बंगळूरूआणि अन्य  12 शहरांची नावेबदलण्याची परवानगी कर्नाटक सरकारला मिळाली आहे.  

 

Web Title: Black Day in Belgaum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.