लोकशाहीतील काळा दिवस -सोनिया गांधी

By admin | Published: August 3, 2015 11:48 PM2015-08-03T23:48:02+5:302015-08-03T23:48:02+5:30

‘लोकशाहीतील काळा दिवस’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी २५ पक्ष खासदारांच्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर दिली असतानाच तृणमूल काँग्रेस

Black Day in Democracy - Sonia Gandhi | लोकशाहीतील काळा दिवस -सोनिया गांधी

लोकशाहीतील काळा दिवस -सोनिया गांधी

Next

शीलेश शर्मा , नवी दिल्ली
‘लोकशाहीतील काळा दिवस’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी २५ पक्ष खासदारांच्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर दिली असतानाच तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांनी काँग्रेसला जोरदार समर्थन देत पाच दिवस लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार घालणार असल्याची घोषणा केली आहे.
काँग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित केल्यानंतर सोनिया गांधी यांनी संताप व्यक्त केला. नरेंद्र मोदी यांचे सरकार लोकशाहीत गुजरात मॉडेलचा अवलंब करीत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे. गुजरात विधिमंडळात विरोधी सदस्यांना निलंबित केले जाते. तशाच बाबी घडत आहेत. संसदेतही गुजरात मॉडेलची अंमलबजावणी केली जात आहे. लोकसभेच्या अध्यक्ष राजकीय दबावाखाली आहेत, असे काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले.

Web Title: Black Day in Democracy - Sonia Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.