नसरल्लाहच्या मृत्यूचे पडसाद भारतात उमटले; लखनौला शेकडो लोक रस्त्यावर उतरले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 12:52 PM2024-09-30T12:52:37+5:302024-09-30T12:54:04+5:30

नसरल्लाहच्या मृत्यूवर शिया समाजातील हजारो महिला आणि मुलेही सहभागी झाले होते. यावेळी मौलाना यांनी इस्त्रायली पंतप्रधानांवर निशाणा साधला.

Black flags raised in protest against Hassan Nasrallah's death; shops remained closed in Lucknow | नसरल्लाहच्या मृत्यूचे पडसाद भारतात उमटले; लखनौला शेकडो लोक रस्त्यावर उतरले

नसरल्लाहच्या मृत्यूचे पडसाद भारतात उमटले; लखनौला शेकडो लोक रस्त्यावर उतरले

लखनौ - हिजबुल्लाहचा मुख्य हसन नसरल्लाहच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ इथं मोठ्या संख्येने विरोध प्रदर्शन करण्यात आलं. छोट्या इमामबाड्यापासून मोठ्या इमामबाडाच्या रस्त्यावर हजारोंच्या संख्येने लोक उतरले होते. इस्त्रायलनं २७ सप्टेंबरला केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये नसरल्लाह मारला गेला. हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाहच्या मृत्यूनंतरही लेबनानमध्ये दहशतवादी ठिकाणांवर इस्त्रायलानं हवाई हल्ले सुरूच ठेवलेत. 

नसरल्लाह वयाच्या ३० व्या वर्षी १९९२ मध्ये हिजबुल्लाहचा महासचिव बनला होता. पुढील ३२ वर्षात त्याने हिजबुल्लाहला ना केवळ लेबनानमध्ये तर मध्य पूर्वमधील एक मोठी ताकद बनवली होती. तो इस्त्रायलचा नंबर वनचा शत्रू होता. अखेर इस्त्रायलच्या हल्ल्यात नसरल्लाह ठार झाला. या हसन नसरल्लाहच्या हत्येविरोधात रविवारी हुसैनाबाद फूड स्ट्रीट बंद होते. दुकाने आणि घरांवर काळे झेंडे फडकवले होते. हजारो महिला पुरुष हातात मेणबत्ती आणि मोबाईल टॉर्च घेऊन रस्त्यावर रॅलीत सहभागी झाले. 

शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जवाद यांनी हसन नसरल्लाहच्या मृत्यूवर ३ दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. एक नसरल्लाह शहीद झाला असे अनेक नसरल्लाह जन्माला येतील असं त्यांनी विधान केले. छोटे इमामबाडा येथे संध्याकाळी ५ च्या सुमारास लोक जमू लागले. रात्र होताहोता ही संख्या हजारोंवर पोहचली. त्यानंतर इस्त्रायल अमेरिका मुर्दाबाद आणि सैय्यद हसन नसरुल्लाह अमर रहे अशा घोषणाबाजीसह मेणबत्ती आणि मोबाईल टॉर्चच्या उजेडात रॅली काढली गेली. या रॅलीमुळे ६ ते ९ या काळात अजादारी रोडची वाहतूक बंद करण्यात आली. रस्त्यावर केवळ आंदोलनकर्ते जमले होते. 

मोठ्या इमामबाडा इथं रस्त्यावर इस्त्रायलचा झेंडा, राष्ट्रपती नेतन्याहू यांचे फोटो पडले होते. इस्त्रायली झेंडा लोकांनी पायदळी तुडवत निषेध नोंदवला. त्यासोबत शाही गेटवर नसरल्लाहचा फोटो लावला ज्यात सलाम आणि शहीद असा उल्लेख करण्यात आला. नसरल्लाहच्या मृत्यूवर शिया समाजातील हजारो महिला आणि मुलेही सहभागी झाले होते. यावेळी मौलाना यांनी इस्त्रायली पंतप्रधानांवर निशाणा साधला. नसरल्लाह दहशतवादी नव्हता तर नेतन्याहू दहशतवादी आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. 

जगभरातील मुस्लिमांना आवाहन

या आंदोलनात सहभागी हुसैनी टायगरचे सदस्य जरी यांनी हसन नसरल्लाहच्या मृत्यूवर ३ दिवस दुखवटा आयोजित केला जाईल. आम्ही आम्ही शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून इस्त्रायलचा विरोध करत आहोत. इस्त्रायली पंतप्रधान पीडितांना मदत करणाऱ्यांवर हल्ला करत आहेत. आम्ही जगातील ५६ मुस्लीम देशांना एकत्र येत या अन्यायाविरोधात आवाज उचला असं आवाहन करतो असं त्यांनी सांगितले.
 

Web Title: Black flags raised in protest against Hassan Nasrallah's death; shops remained closed in Lucknow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.