Black Fungus: ॲम्फोटेरिसीन-बीची टंचाई; म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी केला जातो वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 06:17 AM2021-05-31T06:17:40+5:302021-05-31T06:18:02+5:30
सदानंद गौडा म्हणाले की, सहा आठवड्यांच्या उपचारासाठी २९ लाख कुप्यांची (औषधाची बाटली) आवश्यकता आहे. २२ मे रोजी देशात ८८४८ रुग्ण होते. २६ मे रोजी ही संख्या ११,७१७ वर पोहोचली. चार दिवसांत या रुग्णांची संख्या २८६९ ने वाढली.
नवी दिल्ली : देशात म्युकरमायकोसिसची (ब्लॅक फंगस) ११,७०० प्रकरणे समोर आली आहेत, अशी माहिती केंद्रीय रसायनमंत्री सदानंद गौडा यांनी दिली.
सदानंद गौडा म्हणाले की, सहा आठवड्यांच्या उपचारासाठी २९ लाख कुप्यांची (औषधाची बाटली) आवश्यकता आहे. २२ मे रोजी देशात ८८४८ रुग्ण होते. २६ मे रोजी ही संख्या ११,७१७ वर पोहोचली. चार दिवसांत या रुग्णांची संख्या २८६९ ने वाढली.
म्युकरमायकोसिसच्या रुग्णाला ५ ते ७ कुप्यांची दररोज आवश्यकता असते. हे उपचार ४२ दिवस अथवा सहा आठवडे चालतात. म्हणजे, प्रत्येक रुग्णाला २५० कुप्या लागतात. ११,७०० रुग्णांसाठी ७०,२०० कुप्यांची दररोज आवश्यकता आहे. केंद्र सरकार २२ मे पासून या औषधांचे वितरण करीत आहे. मे महिन्यात १.६३ लाख कुप्यांचे उत्पादन झाले. जूनमध्ये हे उत्पादन २.५५ लाखांपर्यंत जाईल, अशी शक्यता आहे. जून महिन्यात ३.१५ लाख कुप्यांची आयात करण्याची योजना आहे.
सदानंद गौडा यांनी ट्विट केले आहे की, ॲम्फोटेरिसीन-बीच्या ५.७० लाख कुप्या जून महिन्यात आयात करण्यात येतील.