CoronaVirus Live Updates : ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर पुन्हा एकदा हल्ला करतोय कोरोना; 2 महिन्यांत दुसऱ्यांदा लागण, डॉक्टरही हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 01:52 PM2021-07-07T13:52:36+5:302021-07-07T14:07:45+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाबाबत सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 43,733 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाबाबत सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. याच दरम्यान धडकी भरवणारी माहिती आता समोर आली आहे. ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर पुन्हा एकदा कोरोना हल्ला करत आहे. दोन महिन्यांत रुग्णाला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरही या घटनेने हैराण झाले असून रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या वैशालीमध्ये राहणाऱ्या 43 वर्षीय रुग्णाला पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. काही दिवसांपूर्वी या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्याने यावर यशस्वीरित्या मातही केली होती. मात्र यानंतर ब्लॅक फंगसचा संसर्ग झाल्याने त्यांना पीएमसीएचमध्ये भरती करण्यात आलं. येथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी त्यांची चाचणी केली असता. दोन महिन्यांत दुसऱ्यांदा रुग्णाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या घटनेने डॉक्टरांच्या चिंतेत भर पडली आहे. रुग्णांवर योग्य ते उपचार सुरू असल्याची माहिती दिली आहे.
Corona Vaccine : कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronaVaccine#coronavaccinationhttps://t.co/PLzGNxZ8cM
— Lokmat (@MiLOKMAT) July 7, 2021
पीएमसीएचच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 मे रोजी या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्यामध्ये ब्लॅक फंगसची काही लक्षणं आढळून आली. त्यामुळे 4 जून रोजी रुग्णावर सर्जरी केली आली. त्यावेळी त्याची रॅपिड अँटीजन आणि आरटी-पीसीआर टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. दुसरी सर्जरी केल्यानंतर पुन्हा एकदा स्वॅब सॅपल घेण्यात आलं तेव्हा 5 जुलै रोजी त्यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णालय प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच त्यांनी रुग्णाला कोरोना वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
ब्लॅक फंगसमधून बरे झालेल्या रुग्णांची प्रकृती गंभीर; 'हा' दुर्मिळ आजार ठरतोय जीवघेणा#BlackFungus#mucormicosis#Hospital#Doctorhttps://t.co/t6LF96MgAp
— Lokmat (@MiLOKMAT) July 2, 2021
धोका वाढला! कोरोनातून बरं झालेल्या रुग्णांमध्ये Bone deathची गंभीर समस्या; डॉक्टरांच्या चिंतेत भर
कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एक गंभीर समस्या आढळून येत आहे. कोरोनावर मात केलेल्या काही रुग्णांमध्ये एवॅस्कुलर नेक्रोसिस (Avascular necrosis- AVN) म्हणजेच बोन डेथ (Bone Death) ची समस्या पाहायला मिळत आहे. बोन डेथमध्ये शरीरातील हाडांवर गंभीर परिणाम होत आहे. बोन टिश्यूपर्यंत रक्त पुरवठा सुरळीत होत नसल्याने एवॅस्कुलर नेक्रोसिसची गंभीर समस्या रुग्णांमध्ये निर्माण होत आहे. मुंबईतील 40 वर्षांहून कमी वय असलेल्या तीन रुग्णांमध्ये एवॅस्कुलर नेक्रोसिस आढळून आले आहेत. मुंबईत बोन डेथचे रुग्ण आढळून आल्याने ड़ॉक्टरांच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच येत्या काही दिवसांत रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती देखील डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
CoronaVirus Live Updates : कोरोनाचा वेग मंदावताना काही राज्यांमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर; रुग्णसंख्येत होतेय सातत्याने वाढ#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/MjYdwWLMRx
— Lokmat (@MiLOKMAT) July 6, 2021