250 खातेदारांकडून काळ्य़ा पैशाची कबुली
By admin | Published: November 27, 2014 01:38 AM2014-11-27T01:38:01+5:302014-11-27T01:38:01+5:30
250 खातेधारकांनी विदेशातील बँकेत आपला पैसा जमा असल्याची कबुलीही दिलेली आहे, अशी माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी राज्यसभेत दिली.
Next
नवी दिल्ली : विदेशात बँक खाते असलेल्या 427 भारतीयांची नावे सरकारला कळालेली आहेत आणि त्यापैकी 250 खातेधारकांनी विदेशातील बँकेत आपला पैसा जमा असल्याची कबुलीही दिलेली आहे, अशी माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. विदेशात जमा असलेला हा काळा पैसा भारतात परत आणण्याच्या दिशेने सरकारने उचित पावले उचललेली आहेत, असे जेटली यांनी सांगितले.
काळ्या पैशाच्या मुद्यावरून विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले. सत्तेवर आल्यानंतर 1क्क् दिवसाच्या आत विदेशात जमा असलेला काळा पैसा परत आणू आणि प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 ते 2क् लाख रुपये जमा करू, या भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल विरोधकांनी सरकारला केला. मात्र जेटली यांनी त्याला उत्तर दिले नाही. जेटली यांचे उत्तर पूर्ण होण्याआधीच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, संयुक्त जनता दल, समाजवादीपार्टी आणि माकप सदस्यांनी सभात्याग केला. निवडणुकीच्या आधी व नंतरच्या काळात भाजपाच्या सरकारने दिलेल्या आश्वासनांवर शरसंधान करीत काँग्रेसने बुधवारी सत्तारूढ पक्षावर राजकीय लाभाकरिता काळ्या पैशाबाबत देशाची दिशाभूल केल्याचा आरोप करून त्याने त्याकरिता देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी लोकसभेत केली. काळ्या पैशावरील या चर्चेत भाजपाच्या अनुरागसिंग ठाकूर यांनी काँग्रेसलाही यावेळी प्रतिटोला दिला.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या मंगळवारी या मुद्यावर झालेल्या गोंधळानंतर लोकसभेत काँग्रेसचे नेते मल्लिकाजरुन खरगे बुधवारी या विषयाची चर्चा सुरू करताना महणाले, ‘निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी, परदेशात असलेला काळा पैसा भारतात आणून देशातील प्रत्येक व्यक्तीला त्यातील 15 लाख रुपये दिले जातील, असे सांगून जनतेच्या भावनांसोबत खेळ केल्याचे म्हटले. आता ते पंतप्रधान झाले आहेत आणि त्यांच्याजवळ सर्व यंत्रणा व ताकद आहे. मी आपणास दुखवू इच्छित नाही मात्र स्मरण करून देऊ इच्छितो की, आपले सरकार सत्तेत आल्यानंतर 1क्क् दिवसात परदेशातील काळा पैसा भारतात आणू असे आश्वासन भाजपा नेत्यांनी दिले होते मात्र त्यातील एक पैसाही अद्याप भारतात आलेला नाही.’
सर्व संदिग्ध खातेधारकांच्या नावांचा खुलासा करण्याबाबत सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या वक्तव्याबाबत खरगे यांनी, संयुक्त पुरोगामी आघाडीचेही हेच म्हणणो होते, असे प्रतिपादन केले. जर हीच गोष्ट सांगायची होती तर संपुआ सरकारला बदनाम कशाला केले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याआधीही भाजपा सत्तेत होती. त्यामुळे सरकारसमोरील अडचणींची त्याला कल्पना आहे. मात्र या पक्षाने 125 कोटी नागरिकांची दिशाभूल केली. खोटे बोलणो व खोटी आश्वासने दिल्याबद्दल या सरकारने व पक्षाने देशाची माफी मागावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. नागरिकांच्या भावनांना भडकावल्याने देशाचा काय फायदा झाला असा प्रश्न विचारून त्यांनी, जनतेशी बोलताना तारतम्याने बोलले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
भाजपा सदस्य अनुरागसिंग ठाकूर यांनी काँग्रेसवर परदेशी बँकांमध्ये काळा पैसा ठेवणा:यांना पाठीशी घालण्याचा आरोप करून भाजपा सरकारने सत्तेत आल्यानंतर विशेष तपास पथकाच्या स्थापनेचा निर्णय घेतल्याचे म्हटले. या निर्णयाला काँग्रेस सातत्याने टाळत आली असल्याचाही उल्लेख केला. लोकसभेत उर्व रित चर्चा गुरुवारी झाल्यावर वित्तमंत्री जेटली त्यास उत्तर देतील.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
थोडा वेळ लागेल
विदेशात काळा पैसा असलेल्या लोकांचा सरकार अतिशय सक्रियपणो माग काढेल आणि शोध घेईल. सर्व खातेधारकांची नावे कळल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. विदेशात जमा असलेला काळा पैसा परत आणणो ही एक प्रक्रिया आहे, जी थोडा वेळ घेईल. - अरुण जेटली, वित्तमंत्री
आश्वासनाचे काय ?
आपले सरकार सत्तेत आल्यानंतर 1क्क् दिवसात परदेशातील काळा पैसा भारतात आणू असे आश्वासन भाजपा नेत्यांनी दिले होते मात्र त्यातील एक पैसाही अद्याप भारतात आलेला नाही.
- मल्लिकाजरुन खरगे,
काँग्रेसचे नेते