काळे धन झाले आता जनधन

By Admin | Published: May 27, 2017 02:49 AM2017-05-27T02:49:49+5:302017-05-27T02:49:49+5:30

आतापर्यंत देशात काळे धन होते. आमच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे ते काळे धन आता जनधन आणि डीजी धन झाले आहे, बेनामी संपत्ती कायदा २८ वर्षांपूर्वी झाला

Black money was made now | काळे धन झाले आता जनधन

काळे धन झाले आता जनधन

googlenewsNext

गुवाहाटी : आतापर्यंत देशात काळे धन होते. आमच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे ते काळे धन आता जनधन आणि डीजी धन झाले आहे, बेनामी संपत्ती कायदा २८ वर्षांपूर्वी झाला, पण आमच्याच सरकारने त्याची अमलबजावणी केली, असे सांगतानाच शेतकऱ्यांचे उत्पन्न २0२२ पर्यंत दुप्पट होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
मोदी सरकारला आज तीन वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्त सरकारने या काळात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेताना पंतप्रधान म्हणाले की, मला प्रधान सेवक म्हणून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी देशाच्या जनतेचे आभार मानतो. देशाच्या भल्यासाठी आम्ही जी पावले उचलली त्या प्रत्येक निर्णयात देशातील १२५ कोटी जनतेने साथ दिली, याचा मुद्दाम उल्लेख करायला हवा.
मी माझे मन, शरीर, आत्मा आणि आयुष्य देशाला समर्पित केले आहे असे मोदी सांगून ते म्हणाले की, विकास कायमस्वरुपी करायचा असेल तर, पायाभूत सुविधा पहिली गरज आहे. देशाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्या सरकारने पायाभूत सोयी-सुविधांवर लक्ष केंद्रित केले आहे.
गेल्या तीन वर्षांत जी ठोस पावले उचलली गेली त्यामुळे लोकांचे जीवनमान बदलले गेले आहे, असा दावा पंतप्रधान टिष्ट्वटरवर केला. त्यांनी २०१४ आणि २०१७ या कालावधीतील वेगवेगळ्या क्षेत्रांतील फरक दर्शवणारी आकडेवारीही दिली आहे. मोदी यांनी कृषी, मोबाईल बँकिंग, दूरध्वनीची घनता (टेले डेन्सिटी), महिलांचे सक्षमीकरण, मेक इन इंडिया, पर्यटन, विद्युतीकरण, सौर ऊर्जा आणि एलईडी बल्बचे वितरण आदी क्षेत्रांशी संबंधित आलेखही दिले.
गुंतवणुकीला प्रचंड प्रोत्साहन
मेक इन इंडियाचा संदर्भ देत मोदी यांनी म्हटले आहे की, इलेक्ट्रॉनिक उत्पादनामध्ये गुंतवणुकीला प्रचंड प्रोत्साहन मिळाले आहे. या उद्योगातील गुंतवणुकीने २०१३-२०१४ मध्ये ११,१९८ कोटींवरून थेट १,४३,००० कोटींपर्यंत मजल मारली आहे. ‘डिजिटल इंडिया फॉर डेव्हलपड् इंडिया’ या मथळ्याखालील ग्राफिक्स म्हणते की, २०१३-२०१४ मध्ये आॅप्टिकल फायबर ब्रॉडबँड नेटवर्क ३५८ किलोमीटर होते ते आज २.०५,४०४ किलोमीटर झाले आहे.
काँगे्रसची टीका; तीन वर्षांत ‘फुशारक्या अन् अतिशयोक्ती’
काँग्रेसने मात्र आर्थिक आणि सामाजिक अंगांनी देशाचे भवितव्य अंधकारमय आहे, असे भाकीत केले असून, भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कारकीर्दीत देशाला संघर्ष बघावा लागेल, असा आरोप केला. सरकारच्या रोजगार धोरणाबद्दल श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी काँग्रेसने केली. पक्षाचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी मोदी सरकारवर थेट हल्ला केला. गेल्या तीन वर्षांत या सरकारबद्दल सांगायचे तर ते एवढेच की ‘फुशारक्या, आलंकारिक भाषा आणि अतिशयोक्ती. ’ देशाने यापूर्वी कधीही अशी विभागणी पाहिली नव्हती. देश भविष्यात संघर्षाच्या काठावर उभा असल्याचे दिसत आहे, असे कमलनाथ म्हणाले.

Web Title: Black money was made now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.