सूर्यावर काळा डाग
By admin | Published: May 10, 2016 03:27 AM2016-05-10T03:27:07+5:302016-05-10T03:27:07+5:30
दहा वर्षांच्या कालखंडानंतर आलेली बुध पारगमन किंवा अधिक्रमणाची ही दुर्मीळ घटना खगोलप्रेमींसाठी अनोखी मेजवानी ठरली.
बुधाचे पारगमन : खास दुर्बिणीतून पाहिली गेली अद्भुत खगोलीय घटना
नवी दिल्ली : बुधाचा काळा ठिपका सूर्याच्या पृष्ठभागावरून सरकत असल्याचे अनोखे खगोलीय दृश्य सोमवारी बघायला मिळाले. दहा वर्षांच्या कालखंडानंतर आलेली बुध पारगमन किंवा अधिक्रमणाची ही दुर्मीळ घटना खगोलप्रेमींसाठी अनोखी मेजवानी ठरली.
काय असते बुधाचे अधिक्रमण
सोमवारी संध्याकाळी ४.४० वाजता बुधाच्या पारगमनाला प्रारंभ झाला. हे दृश्य शतकातून केवळ १३-१४ वेळा दिसते. भारतात १० वर्षांनंतर हा दुर्मीळ योग जुळून आला. युरोप, आफ्रिका, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, आर्क्टिक, उत्तर अटलांटिक महासागर आणि प्रशांत महासागराच्या (पॅसिफिक) भागातही हे दृश्य दिसले.
बुधाचे अधिक्रमण
१५ नोव्हेंबर १९९९
७ मे २००३
८ नोव्हेंबर २००६
बुध सूर्याच्या पृष्ठभागावरून सरकत गेला. त्यावर काळा टिळा लावल्यासारखे दृश्य होते.