काळा नवरा नको गं बाई..

By Admin | Published: April 23, 2016 03:02 AM2016-04-23T03:02:21+5:302016-04-23T03:02:21+5:30

हुंडा मागितला म्हणून, नवरदेव मद्यप्राशन करून मंडपात आला म्हणून किंवा पतीच्या घरी शौचालय नसल्याचे कळल्यामुळे वरात परत पाठविण्याचे धाडस वधूंनी केल्याच्या गोष्टी ऐकिवात आहेत

Black woman is not bored. | काळा नवरा नको गं बाई..

काळा नवरा नको गं बाई..

googlenewsNext

आग्रा : हुंडा मागितला म्हणून, नवरदेव मद्यप्राशन करून मंडपात आला म्हणून किंवा पतीच्या घरी शौचालय नसल्याचे कळल्यामुळे वरात परत पाठविण्याचे धाडस वधूंनी केल्याच्या गोष्टी ऐकिवात आहेत, पण आग्य्रात दोन बहिणींनी वर्ण काळा आणि मुलगा पसंत नसल्याचे कारण देत दोन नवरदेवांना परत पाठविल्याचा अजब प्रकार बुधवारी रात्री घडला.
त्याच रात्री या जिल्ह्णातील अन्य एका ठिकाणी एका महिलेने आवडीच्या व्यक्तीशी लग्नाचा घातलेला घाट तिच्या पतीने कोर्टाचा आदेश दाखवत अखेरच्या क्षणी हाणून पाडला. यातील लग्नाची पहिली गोष्ट ही फतेहाबादच्या सिकरारा या गावी घडली. दोन बहिणींनी नवरदेवांचे केवळ फोटो बघितले होते. एका धार्मिक बाबाच्या शिफारशीवरून या मुलींच्या आईने हा विवाह जुळवून आणला होता.
बुधवारी या दोघींनी प्रथमच नवरदेवांना बघितले. काळा वर्ण आणि वय जास्त असल्याचे कारण देत त्यांनी नकार देताच वरमंडळीच्या तंबूत खळबळ उडाली.
नवरदेवांनी पंचायत आणि नातेवाइंकाकडून दबाव आणून बघितला मात्र प्रयत्न निष्फळ ठरल्यामुळे त्यांना अलिगडला रित्या हस्ते माघारी परतावे लागले. (वृत्तसंस्था)
दुसऱ्याशी लग्नाचा डाव उधळला दुसरी गोष्ट आहे ती इतमाद-उद-दौला या गावच्या महिलेने पतीलाच न ओळखण्याची. हाथरस येथील अभियंत्याने ही महिला पत्नी असल्याचा दावा केला. तिचे लग्न रोखण्यासाठी त्याने न्यायालयातून आदेश मिळविला होता. या महिलेला ९ मे रोजी न्यायालयात हजर होण्याचा आदेश देण्यात आला असताना ती दुसऱ्यासोबत बोहल्यावर चढणार होती. कोर्टाचा बडगा दाखवत पतीने या महिलेच्या दुसऱ्या लग्नाचा डाव हाणून पाडला. त्यामुळे ही महिला आणि तिचा नियोजित नवरदेव दोघांनाही मंडपातून परतावे लागले.विशेष या महिलेच्या वडिलांना कोर्टाच्या आदेशाबाबत माहिती होती, पण त्यांनी मुलीला काहीही सांगितले नव्हते.

Web Title: Black woman is not bored.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.