BlackBuck Poaching Case : या कारणांमुळे सलमान खानला मिळू शकतो जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 10:21 AM2018-04-06T10:21:37+5:302018-04-06T10:21:37+5:30
सलमान खानला जामीन मिळल्याची शक्यताही वर्तविली जाते आहे.
मुंबई- 1998 साली घडलेल्या काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला गुरूवारी जोधपूर संत्र न्यायालयाने दोषी ठरवत 5 वर्षांची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनाविल्यानंतर सलमानची रवानगी तुरुंगात करण्यात आली. आज (6 मार्च) सलमानच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. सत्र न्यायालयाकडून सलमान खानला जामीन मिळल्याची शक्यताही वर्तविली जाते आहे. या महत्त्वाच्या कारणामुळे सलमानला जामीन मिळू शकतो..
1. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणेज प्रकरणाच्या 20 वर्षाच्या काळात कोर्टाने सलमानला जेव्हाही सुनावणीसाठी बोलावलं त्या त्या वेळी सलमान कोर्टात हजर राहिला.
2. तपास यंत्रणांनासुद्धा सलमानने सहकार्य केलं.
3. हिट अॅण्ड रन प्रकरणात सलमान ज्या प्रकारे वागला होता त्याच्या बरोबर उटल सलमान या प्रकरणात वागला. सलमानने मीडियाबरोबर उद्धट वर्तन केलं नाही. तसंच कोर्टाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही.
4. सलमान खानबरोबरच सहआरोपी असलेले सैफ अली खान, तब्ब, नीलम, सोनाली बेंद्रे यांना कोर्टाने निर्दोष ठरविलं त्यामुळे सलमानच्या बाजूने निर्णय लागण्याची शक्यता आहे.
5. याच प्रकरणात बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी आधीच कोर्टाने सलमाला निर्दोष ठरविलं आहे.
6. गुरूवात कोर्टाने सलमानला शिक्षा सुनावली पण या प्रकरणात कुठलही नवा पुरावा कोर्टासमोर आला नाही.