मैत्रीणीला ‘ब्लॅकमेल’ करणारा गजाआड

By admin | Published: January 20, 2017 08:29 PM2017-01-20T20:29:32+5:302017-01-20T20:29:32+5:30

शीतपेयामधून गुंगीचे औषध देऊन मैत्रीणीचे अर्धनग्न अवस्थेतेतील काढलेले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत सव्वा लाखांची खंडणी उकळण्यात

Blackmailing 'Blackmail' to Girlfriend | मैत्रीणीला ‘ब्लॅकमेल’ करणारा गजाआड

मैत्रीणीला ‘ब्लॅकमेल’ करणारा गजाआड

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.20 - शीतपेयामधून गुंगीचे औषध देऊन मैत्रीणीचे अर्धनग्न अवस्थेतेतील काढलेले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत सव्वा लाखांची खंडणी उकळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका तरुणाला मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केली असून हा प्रकार 18 जानेवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडला.
अथर्व नितिन सोनवणे (वय 18, रा. तारांगणे बिल्डींग, वास्तूनगर सोसायटी, मार्केट यार्ड) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 19 वर्षीय पिडीत तरुणीने फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फॅशन डिझायनींगच्या कोर्सला शिकत असलेली ही तरुणी आरोपीच्या ओळखीची आहे. आरोपी एका नामांकित महाविद्यालयात बीसीएच्या प्रथम वर्षाला शिकत आहे. दोघेही एकाच सोसायटीमध्ये राहण्यास आहेत. त्यांच्यामध्ये मैत्रीपुर्ण संबंध निर्माण झाले होते. आरोपीच्या आईवडीलांनी दुसरे घर खरेदी केले असून हे सर्वजण त्या घरी राहण्यास गेले आहेत. त्यानंतरही हे दोघे व्हॉट्सअ‍ॅप व सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्कात होते.
आरोपीने दोन तीन वेळा कॉफी पिण्यासाठी बोलावल्यावर ती त्याच्याकडे गेली होती. सात महिन्यांपुर्वी आरोपीने असेच एकदा कॉफी पिण्यासाठी बोलावले असता शीतपेयामधून गुंगीचे औषध दिले. तिला गुंगी आल्यावर त्याने तिचे अर्धनग्न फोटो काढले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तो पैशांची मागणी करु लागला. व्यावसायिक असलेल्या वडीलांकडून पाठवले जाणारे पैसे घरात कुठे ठेवले जातात याची माहिती तिला होती. तिने यातील एक लाख वीस हजार रुपये काढून आरोपीला दिले. त्यानंतर त्याने आणखी 50 हजारांची मागणी करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्याच्या त्रासाला कंटाळलेल्या तरुणीने हा प्रकार आईवडीलांना सांगितला. त्यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दाखल केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए.डी.पडाळकर करीत आहेत.

Web Title: Blackmailing 'Blackmail' to Girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.