विरोधकांची टीका उधळा

By admin | Published: January 7, 2017 04:49 AM2017-01-07T04:49:48+5:302017-01-07T04:49:48+5:30

पाकिस्तानला शिकवलेला धडा हे जनतेसमोर मांडा व विरोधकांची टीका उधळून लावा, असे आवाहन अमित शाह यांनी शुक्रवारी केले

Blame the opponents | विरोधकांची टीका उधळा

विरोधकांची टीका उधळा

Next

नितीन आगरवाल,

नवी दिल्ली- निवडणूक प्रचारात नोटाबंदीमुळे नष्ट झालेला काळा पैसा, भ्रष्ट मंडळींची विरोधक करीत असलेले पाठराखण, दहशतवादी कारवायांना बसलेला आळा आणि सर्जिकल स्ट्राइक्सद्वारे पाकिस्तानला शिकवलेला धडा हे जनतेसमोर मांडा व विरोधकांची टीका उधळून लावा, असे आवाहन भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीपूर्वी पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी शुक्रवारी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीत पाच राज्यांतील निवडणुकीची व्यूहरचना ठरणार आहे. पक्ष नोटाबंदीला प्रमुख निवडणूक मुद्दा बनवू इच्छितो. गरिबांना डोळ्यांसमोर ठेवून सुरू केलेल्या योजना व सर्जिकल स्ट्राइक यांचाही लाभ उठविण्याचा प्रयत्न आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अलीकडे आणण्यावरून विरोधकांनी टीका सुरू केली आहे. भाजपाचे नेतृत्व याबाबत विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवू शकते. विरोधक मोदींचा गरीबसमर्थक अजेंडा उधळून लावण्याचा एक प्रयत्न करीत असल्याचा आरोप भाजपातर्फे केला जाईल.

Web Title: Blame the opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.