रेल्वेतील ब्लँकेटस दोन महिन्यांनी धुतात
By admin | Published: February 28, 2016 01:25 AM2016-02-28T01:25:02+5:302016-02-28T01:25:02+5:30
लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करीत असताना तुम्हाला पुरविण्यात आलेली ब्लँकेटची दुर्गंधी येत असेल तर ते ब्लँकेट महिना वा दोन महिन्यांपासून तरी धुतलेले नाही असे समजावे.
नवी दिल्ली : लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करीत असताना तुम्हाला पुरविण्यात आलेली ब्लँकेटची
दुर्गंधी येत असेल तर ते ब्लँकेट
महिना वा दोन महिन्यांपासून तरी धुतलेले नाही असे समजावे. रेल्वेत प्रवाशांना दिली जाणारे ब्लँकेट दोन महिन्यांतून एकदा धुतले जातात, अशी कबुली खुद्द रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली.
सुदैवाने प्रवाशांना पुरविण्यात येणारी बेडशीट्स आणि पिलो कव्हर मात्र दररोज धुतली जातात. मेल आणि एक्सप्रेस रेल्वे गाड्यांमध्ळे प्रवाशांना पुरविण्यात येणाया कपड्यांचा दर्जा व आरोग्याच्या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात रेल्वे राज्यमंत्र्यांनी ही कबुली दिली. राज्यसभेच्या सदस्यांनी रेल्वे प्रवासात त्यांना आलेले अनुभव सांगितले. त्यावर मनोज सिन्हा यांनी दिलेले उत्तर
ऐकून सभापती हामिद अन्सारी
हेही चकित झाले. आता प्रवाशांनी स्वत:चे अंथरुण, पांघरुण
घेऊन रेल्वे प्रवास केला पाहिजे,
असा टोला त्यांनी मारला. त्यावर ‘चांगली सूचना आहे,’ असे सिन्हा म्हणाले.
दरम्यान रेल्वेने सिन्हा यांच्या या वक्तव्याचे समर्थंन केले आहे. ब्लँकेट्स दररोज धुणे शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला ब्लँकेट झाकण्यासाठी अतिरिक्त बेड शीट दिली जाते, असा युक्तिवाद रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने केला आहे. रोगजंतूंचा नाश करण्यासाठी आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी दर १५ दिवसातून एकदा ब्लँकेट्सची साफसफाई करण्यात येते.
याशिवाय रेल्वेने बेडरोल टेकअवे योजनाही सुरू केली आहे. याअंतर्गत प्रवासी ११० रुपयांत ब्लँकेट किंवा १४० रुपयांत दोन बेडशीट्सची आॅनलाईन खरेदी करू शकतात आणि ते प्रवासानंतर त्यांना सोबतही नेता येऊ शकते, असे
हा अधिकारी म्हणाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)