Blast in Chemical Company : भरूचमधील केमिकल फॅक्टरीत स्फोट, २४ कर्मचारी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 08:42 AM2021-02-23T08:42:39+5:302021-02-23T09:01:52+5:30

Blast in Chemical Company, several injured in Bharuch Gujarat : यूपीएल-५ प्लांटमध्ये मंगळवारी रात्री दोन वाजता स्फोट झाला. त्यानंतर प्लांटमध्ये आग लागली.

blast in chemical company, several injured in bharuch, gujarat | Blast in Chemical Company : भरूचमधील केमिकल फॅक्टरीत स्फोट, २४ कर्मचारी जखमी

Blast in Chemical Company : भरूचमधील केमिकल फॅक्टरीत स्फोट, २४ कर्मचारी जखमी

Next
ठळक मुद्देया आगीत जवळपास २४ कर्मचारी जखमी झाले आहेत.

अहमदाबाद : गुजरातमधील भरूच जिल्ह्यात मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. येथील झगडियामध्ये असलेली केमिकल कंपनी (Chemical Company) यूपीएल-५ प्लांटमध्ये स्फोट (Blast) झाल्यामुळे आग लागली. या आगीत जवळपास २४ कर्मचारी जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, यूपीएल-५ प्लांटमध्ये मंगळवारी रात्री दोन वाजता स्फोट झाला. त्यानंतर प्लांटमध्ये आग लागली. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. कंपनीच्या सीएम नावाच्या प्लांटमध्ये ही दुर्घटना घडली. स्फोट इतका मोठा होती की त्याचा आवाज १५ किलोमीटरपर्यंत गेला. स्फोटानंतर परिसरातील गावांमध्ये भूकंप झाल्यासारखे जाणवले आणि लोक घरातून बाहेर पडले.

या दुर्घटनेत २४ कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारांसाठी भरूच आणि बडोदामधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या स्फोटाने कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्नीशमन दलाकडून सुरू आहेत. आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत.  

मीडिया रिपोर्टनुसार, स्फोटामुळे यूपीएल कंपनीजवळ असलेल्या दढेडा, फुलवाडी आणि करलसाठी गावांमधील घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या वर्षी जून महिन्यात भरूचमधील पटेल ग्रुपच्या केमिकल फॅक्टरीत स्फोट झाला होता. हा स्फोट स्टोरेज टँकमध्ये झाला होता. त्यावेळी स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला होता, तर जवळपास ७७ लोक जखमी झाले होते. 

Read in English

Web Title: blast in chemical company, several injured in bharuch, gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.