मोदींच्या रॅलीत स्फोट घडवून दहशतवाद्यांची रंगीत तालीम

By Admin | Published: March 23, 2017 12:09 PM2017-03-23T12:09:08+5:302017-03-23T12:25:16+5:30

लखनऊत घडवण्यात आलेला हलका स्फोट सरावासाठी घडवण्यात आला होता, जेणेकरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढील रॅलीत मोठे स्फोट घडवले जावेत

The blasts in Modi's rally blamed the terrorists | मोदींच्या रॅलीत स्फोट घडवून दहशतवाद्यांची रंगीत तालीम

मोदींच्या रॅलीत स्फोट घडवून दहशतवाद्यांची रंगीत तालीम

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नोएडा, दि. 23 - भोपाळ - उज्जैन ट्रेन स्फोटात पकडल्या गेलेल्या संशयित दहशतवाद्यांनी गतवर्षी 11 ऑक्टोबर रोजी दस-याला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लखनऊ रॅलीत कमी तीव्रतेचा स्फोट घडवून आणला होता. सभेच्या जागेपासून 250 मीटर अंतरावर हा स्फोट घडवून आणण्यात आला होता. मात्र रावण दहनाच्या कार्यक्रमामुळे स्फोटाचा आवाज लोकांना ऐकू गेला नाही. या स्फोटामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नव्हती. आतिफ मुजफ्फर उर्फ अल कासिम याच्यासोबत अन्य तीन संशयित दहशतवाद्यांची पोलिसांनी चौकशी केली असता ही माहिती समोर आली आहे. या संशयितांची उत्तर प्रदेश एटीएस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणाही चौकशी करत आहे.

(कानपूर रेल्वे अपघात प्रकरणी ISI एजंटला अटक)
(लखनऊत मोदींच्या रॅलीआधी रेल्वे अपघाताचा कट ?)
 
रंगीत तालमीसाठी घडवला ट्रेन स्फोट - 
लखनऊत घडवण्यात आलेला हलका स्फोट सरावासाठी घडवण्यात आला होता, जेणेकरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढील रॅलीत मोठे स्फोट घडवले जावेत. भोपाळ - उज्जैन ट्रेन स्फोटही सरावासाठीच करण्यात आला होता. स्फोट घडवणारे इसीससाठी काम करणा-या सिरियामधील पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवत असतानाचे आणि स्फोट झाल्यानंतरचे फोटो पाठवण्यात आले होते. स्फोट झाल्यानंतरच्या बातम्यांच्या लिंकही पाठवण्यात आल्या होत्या. आपलं काम पाहून हँण्डलरनी आपल्याला सिरियाला बोलवावं आणि प्रशिक्षण द्यावं अशी त्यांची इच्छा होती.
 
7 मार्च रोजी झालेल्या भोपाळ - उज्जैन पॅसेंजर ट्रेन स्फोट प्रकरणी  मुजफ्फर उर्फ अल कासिम याच्यासोबत अन्य तीन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. यांच्या चौकशीच्या आधारे उत्तर प्रदेशातून अन्य सहा संशयितांना अटक करण्यात आलं होतं. तर दुसरीकडे लखनऊ चकमकीत सैफुल्लाहला उत्तर प्रदेश एटीएसने ठार केलं होतं.  
 
(भोपाळ-उज्जैन पॅसेंजर ट्रेनमध्ये स्फोट, 4 जखमी)
 
दिल्लीदेखील होती रडारवर - 
या संशयित दहशतवाद्यांनी दिल्ली हादरवण्याचा देखील कट रचला होता. गेल्या वर्षी त्यांनी दिल्लीमधील इंडिया गेटसहित सहा जागांची रेकी केली होती. फेब्रुवारीत हे सर्वजण दिल्लीहून जम्मू काश्मीरला गेले होते. तिथे दहशतवाद्यांमध्ये सामील होऊन सुरक्षा जवानांशी लढण्याचा त्यांचा प्लान होता. त्यांनी पंजाबमधील अमृतसर, राजस्थानमधील जैसलमेर आणि मुंबईतही अनेक ठिकाणांची रेकी केली होती.
 

Web Title: The blasts in Modi's rally blamed the terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.