ब्लिचिंग, तुरटी, क्लोरिनचा ठणठणाट शुद्ध पाणी पुरवठा धोक्यात: ठेकेदाराने मागितली सक्षम अधिकार्याची हमी
By admin | Published: July 5, 2016 12:29 AM2016-07-05T00:29:33+5:302016-07-05T00:29:33+5:30
जळगाव : ऐन पावसाळ्यात महापालिकेच्या उमाळा जलशुद्धीकरण केंद्रावर ब्लिचिंगी, पिवळी तुरटी (ॲलम) क्लोरिनचा ठणठणाट निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. केवळ पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच साठा आता शिल्लक राहिल्याने पाणी पुरवठा विभागाची धावपळ सुरू झाली आहे. पैसे मिळत नसल्याने ठेकेदाराकडून ही कोंडी करण्यात आल्याचे वृत्त आहे.
Next
ज गाव : ऐन पावसाळ्यात महापालिकेच्या उमाळा जलशुद्धीकरण केंद्रावर ब्लिचिंगी, पिवळी तुरटी (ॲलम) क्लोरिनचा ठणठणाट निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. केवळ पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच साठा आता शिल्लक राहिल्याने पाणी पुरवठा विभागाची धावपळ सुरू झाली आहे. पैसे मिळत नसल्याने ठेकेदाराकडून ही कोंडी करण्यात आल्याचे वृत्त आहे. शहरातील पाच लाख नागरिकांना वाघूर योजनेवरून पाणी पुरवठा होत असतो. सध्या पावसाळा असल्याने धरण क्षेत्रात नवीन पाणी येत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन शहरास शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा असे मनपाचे प्रयत्न आहेत. आढावा बैठकीत कडक सूचनाजिल्हा प्रशासनाने मान्सून आढावा बैठकीत पाणी पुरवठ्याबाबत सर्वानाच सावध राहून व काळजी घेत पाणी पुरवठा करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात साथ रोगांचा फैलाव होत असतो. या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेतली जावी अशा सूचना आहेत. यासाठी महापालिकेने आपल्या पावसाळी तयारीच्या अहवालात घेण्यात येत असलेल्या काळजीबाबत विशेष उल्लेखही केला आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी ब्लिचिंग, क्लोरिन व ॲलमचा साठा करून ठेवण्यात येत असल्याचे या अहवालात नमूद आहे मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याचे लक्षात येत आहे. पाच, सहा दिवसांचा साठामहापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे उमाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रावर ब्लिचिंग, लिक्वीड क्लोरिन गॅस व ॲलम (पिवळी तुरटी) चा केवळ पाच ते सहा दिवस पुरेला एवढाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर हे साहित्य मिळावे असे प्रयत्न पाणी पुरवठा विभागाकडून सुरू झाले असून त्यासाठी सतत पाठपुरावा केला जात आहे. ठेकेदारांना वारंवार पत्रव्यवहार करून परिस्थितीचा कल्पना देत. पुरवठा न करणे ही करारातील अटीनुसार कराराचा भंग असल्याबाबत कळविण्यात येत आहे. मात्र तरीही ठेकदार दाद देत नसल्याने पाणी पुरवठा विभागाची डोकेदुखी वाढली आहे. मक्ते दारास दंडाचा इशारा देऊन मनपाकडे असलेल्या अनामत रकमेतून दंडाची वसुली केली जाईल असे स्मरण पत्र देण्यात आले आहे.