अंध श्रीकांतच्या कंपनीची 10 कोटींची उलाढाल

By admin | Published: April 7, 2016 02:12 PM2016-04-07T14:12:31+5:302016-04-07T17:42:47+5:30

श्रीकांत अपंगत्वावर मात करत यशस्वीरीत्या हैदराबादशी संलग्न असलेल्या बोलंट कंपनीचा सीईओ झाला आहे.

Blind Shreekant's company's turnover of 10 crores | अंध श्रीकांतच्या कंपनीची 10 कोटींची उलाढाल

अंध श्रीकांतच्या कंपनीची 10 कोटींची उलाढाल

Next

ऑनलाइन लोकमत
आंध्र प्रदेश, दि. ७- आंध्र प्रदेशमध्ये जन्मतःच अंध असलेल्या 24 वर्षीय श्रीकांत बोल्ला यानं एक कंपनी स्थापन करून त्या कंपनीचा तो सीईओ झाला आहे. श्रीकांतनं अपंगत्वावर मात करत यशस्वीरीत्या हैदराबादमध्ये एक कंपनी स्थापन केली आणि त्या बोलंट कंपनीचा श्रीकांत आता सीईओ झाला आहे.
 श्रीकांत बोल्लानं लहानपणी वडिलांच्या शेतात काम करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला आंधळेपणामुळे वडिलांना शेतात मदत करण्यात अडचणी येत होत्या. अखेर वडिलांनी श्रीकांतला शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला. घरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत श्रीकांत रोज पायी जात असे. तो शाळेतही नेहमी शेवटच्या बाकावर बसत होता. शाळेतली मुलं श्रीकांतसोबत मैत्री करण्यास टाळाटाळ करत होती. त्यावेळी जगातील आपण सर्वात गरीब विद्यार्थी असल्याची जाणीव झाली, असं श्रीकांत बोल्लानं सांगितलं. शाळेत असतानाच बुद्धिबळ आणि क्रिकेट खेळण्याची श्रीकांतला आवड निर्माण झाली. 10वीत असताना श्रीकांतनं 90 टक्के गुण मिळवून यश संपादन केलं. मात्र तो आंधळा असल्यानं त्याला सायन्सला प्रवेश देण्यात आला नाही. मी लोकांच्या नजरेत आंधळा होतो, म्हणून मला प्रवेश दिला नसल्याचं श्रीकांतनं तेव्हा सांगितलं. प्रत्येकाला त्यानं कॉमर्सला जावंसं वाटत होतं. मात्र त्याचा सायन्समध्येच करिअर निश्चय ठाम होता. माझ्या रक्तात काहीही दोष नसल्याचं सांगत मी सायन्समध्ये प्रवेश मिळवणार असं त्यावेळी बोल्लानं सांगितलं. सहा महिने न्यायासाठी कोर्टात त्यानं संघर्ष केला. न्यायालयीन लढ्यानंतर अखेर त्याला सायन्समध्ये प्रवेश देण्यात आला. मात्र चालू वर्षाच्या अर्ध्यापर्यंत बोल्लाला पुस्तक किंवा दुसरा अभ्यासक्रम देण्यात आला नव्हता. मग कॉलेजच्या मार्गदर्शकानं सर्व अभ्यासक्रम एका ऑडियो बुकमध्ये टाकून दिला.
त्यावेळी बोल्लानं त्या ऑडियो अभ्यासक्रमाच्या जोरावर 98 टक्के गुण मिळवून नेत्रदीपक यश संपादन केलं. मात्र पुन्हा तो अंध असल्यानं त्याला स्पर्धात्मक परीक्षेला बसण्यास नकार दिला गेला. त्यावेळी त्यानं अमेरिकेतल्या एमआयटी या विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज केला. आणि त्याला प्रवेशही मिळाला. तेव्हा तो एमआयटीमधून आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिला अंध विद्यार्थी म्हणून उत्तीर्ण झाला. 2012ला त्यानं एमआयटीतून पदवी संपादन केली. त्यानंतर त्यानं बोलंट इंडस्ट्रीची स्थापना केली. त्याच्या कंपनीत आज जवळपास 450 लोक काम करत आहेत. आणि स्वतःच्या कंपनीत त्यानं  60 टक्क्यांहून अधिक अपंगांना सामावून घेतलं आहे. बोल्लाच्या कंपनीनं आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकमध्ये 5 कारखाने स्थापन केले आहेत. आंध्र प्रदेशमधल्या कारखान्यात जवळपास 10 ते 15 कोटींची गुंतवणूकही केली. आणि 10 ते 15 टक्के उत्पादन ते ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीला निर्यात करायला लागले. रस्त्यावर भिकारी दिसल्यास श्रीकांत त्याला पैसे न देता जगण्याची नवी आशा देत असे. त्यानं माजी पंतप्रधान एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबतही काम केलं होतं. आणि आता तो हैदराबादमध्ये स्थापन केलेल्या त्यांच्या कंपनीत सीईओ आहे. या कंपनीची उलाढाल आता जवळपास 10 कोटींच्या घरात आहे. या कंपनीत अशिक्षित आणि शारीरिक अपंगत्व आलेल्या लोकांनाच अधिक प्रमाणात सामावून घेण्यात आलं आहे. श्रीकांतची ही गगनभरारी अनेकांना थक्क करणारी आहे.
.
 

Web Title: Blind Shreekant's company's turnover of 10 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.