भारतातील आठ स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅगचा दर्जा; आंतरराष्ट्रीय बहुमान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 01:40 AM2020-10-12T01:40:33+5:302020-10-12T01:40:52+5:30

कर्नाटकातील दोन ठिकाणांचा समावेश; जगातील ४६६४ समुद्रकिनाऱ्यांचा समावेश

Blue Flag status for eight clean beaches in India; International honor | भारतातील आठ स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅगचा दर्जा; आंतरराष्ट्रीय बहुमान

भारतातील आठ स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅगचा दर्जा; आंतरराष्ट्रीय बहुमान

Next

नवी दिल्ली : जगातील अत्यंत स्वच्छ, पर्यावरणस्नेही व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा असलेल्या समुद्रकिनाºयांना देण्यात येणारा ब्लू फ्लॅग हा दर्जा आता भारतातील आठ समुद्रकिनाºयांना मिळाला आहे. त्यामध्ये कर्नाटकच्या दोन समुद्रकिनाºयांचा समावेश आहे.

फाऊंडेशन आॅफ एन्व्हॉयरमेन्ट एज्युकेशन (एफइई) या संस्थेने ब्लू फ्लॅगचा दर्जा दिलेल्या आठ भारतीय समुद्रकिनाºयांमध्ये शिवराजपूर (गुजरात), घोघला (दीव), कासरकोड आणि पदुबिद्री (दोन्ही कर्नाटकातील), कप्पड (केरळ), ऋषिकोंडा (आंध्र प्रदेश), गोल्डन (ओदिशा), राधानगर (अंदमान) या समुद्रकिनाºयांचा समावेश आहे. जगातील ४६६४ समुद्रकिनाºयांना ब्लू फ्लॅग हा दर्जा मिळाला आहे. त्यामध्ये स्पेनमधील समुद्रकिनाºयांची संख्या सर्वात जास्त आहे. भारताने आपले समुद्रकिनारे स्वच्छ राखण्यासाठी, तिथे पर्यटनाच्या अधिकाधिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी काही योजना आखल्या होत्या. त्याच्या यशस्वी अंमलबजावणीमुळेच देशातील आठ समुद्रकिनाºयांना हा दर्जा मिळाला आहे. ब्लू फ्लॅगचा दर्जा मिळालेले समुद्रकिनारे प्लास्टिक तसेच कचरामुक्त असतात. तिथे पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा तसेच पिण्याचे शुद्ध पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. या सर्व गोष्टींची नीट पडताळणी करून मगच एखाद्या समुद्रकिनाºयाला ब्लू फ्लॅगचा दर्जा देण्यात येतो. यामुळे पर्यटन व्यवसाय वाढीलाही हातभार लागतो. त्यामुळेच भारताने समुद्रकिनारे पर्यावरणस्नेही ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

५० देशांच्या मालिकेत भारत सामील
भारतातील आठ समुद्रकिनाºयांना ब्लू फ्लॅगचा दर्जा मिळाल्याने त्याचा समावेश आता असे समुद्रकिनारे असलेल्या ५० देशांमध्ये झाला आहे. पर्यावरण रक्षणाचे धडे देण्यासाठी फाऊंडेशन आॅफ एन्व्हॉयरर्नमेंट एज्युकेशन ही स्वयंसेवी संस्था डेन्मार्कमधील कोपनहेगन शहरातील मुख्यालयात विविध उपक्रम राबवत असते. तिने समुद्रकिनाºयाला दिलेला ब्लू फ्लॅगचा दर्जा हा जगामध्ये प्रतिष्ठेचा बहुमान समजला जातो.

Web Title: Blue Flag status for eight clean beaches in India; International honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.