बाप्पाच्या स्वागतासाठी मंडळाची लगबग
By admin | Published: September 5, 2016 10:59 PM2016-09-05T22:59:34+5:302016-09-06T00:26:47+5:30
देवळा : बाप्पाच्या स्वागतासाठी सोमवारी शहरातील सर्वच मंडळाची लगबग सुरू होती. ढोल, ताशाच्या गजरात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. यंदा पाऊस समाधानकारक असल्याने गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मंडळानी आकर्षक विद्यूत रोषणाई केली आहे.
पिंपळगावी देखाव्याची क्रेझ
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत येथे मंडळामध्ये देखावे साकारण्यासाठी क्रेझ दिसून येत आहे. मंडळांनी देखावे आकर्षक कसे होतील यासाठी परिश्रम घेतले आहेत. पिंपळगाव परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्वाधिक देखावे मंडळानी साकारले आहेत.
पोलिसांनी गस्त वाढविली
देवळा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी गस्त वाढविली आहे. शहरातील मोठ्या मंडळाच्या परिसरात पोलिस बंदोबंस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे.
टोमॅटोच्या भावात किंचित वाढ
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत टोमॅटोची एक लाख १० हजार के्रट आवक झाली होती. बाजारसमितीत टोमॅटोची आवक वाढली आहे. टोमॅटोला प्रति के्रट २५० ते ४५० रुपये एवढा भाव मिळत आहे. टोमॅटोच्या दरात थोड्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
कारवाईची मागणी
देवळा : देवळा शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे वातावरण आहे. गर्दी असलेल्या परिसरात धूम स्टाईल मोटारसायकल चालविणार्याचे प्रमाण वाढले आहे. धूम स्टाईल मोटारसायकल चालविणार्यामुळे अपघात होऊन निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागतात. त्यासाठी अशा दुचाकी चालकावर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.