बोधगया स्फोटमालिका- इंडियन मुजाहिदिनचे पाच दहशतवादी दोषी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 14:21 IST2018-05-25T14:21:26+5:302018-05-25T14:21:26+5:30
बोधगया येथे 2013 साली स्फोट घडवून आणले गेले होते.

बोधगया स्फोटमालिका- इंडियन मुजाहिदिनचे पाच दहशतवादी दोषी
पाटणा- 2013 साली बोध गया येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेसाठी विशेष एनआयए न्यायालयाने पाच दहशतवाद्यांना दोषी ठरवले आहे. हे दहशतवादी इंडियन मुजाहिदिन संघटनेचे आहेत.
इम्तियाज अन्सारी, हैदर अली, मुजीब उल्लाह, ओमर सिद्दिकी, अझरुद्दीन कुरेशी या पाच जणांना विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश मनोजकुमार सिन्हा यांनी दोषी ठरवले. या सर्व दहशतवाद्यांना भारतीय दंडविधानसंहितेतील कलमांनुसार आणि अनलॉफुल अॅक्टीविटी (प्रिवेन्शन) अॅक्ट अँड एक्सप्लोजिव अॅक्टमधील तरतुदींनुसार दोषी ठरवले आहे. 31 मे रोजी या दोषींना शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
बोधगया येथे 7 जुलै रोजी बॉम्बस्फोट घडवून आणले गेले होते. यामध्ये अनेक बौद्ध भिक्खू व तीर्थयात्री जखमी झाले होते.