अपहरण झालेल्या चिमुरडीचा मृतदेह सापडला विहिरीत कारण अद्याप गुलदस्त्यात : गुन्ाचे कलम वाढण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2016 12:42 AM2016-05-19T00:42:34+5:302016-05-19T00:42:34+5:30
जळगाव: अपहरणाचा गुन्हा दाखल असलेल्या सुप्रीम कॉलनीतील संजना दिलीप साळुंखे या आठ वर्षीय चिमुरडीचा मृतदेह बुधवारी सकाळी पिंप्राळा शिवारातील विहिरीत आढळून आला आहे, त्यामुळे या प्रकरणाला आता कलाटणी मिळाली असली तरी मुख्य कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशनला या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल आहे, तर रामानंदला अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे, एमआयडीसीच्या गुन्ात खुनाचे कलम वाढण्याची शक्यता आहे.
Next
ज गाव: अपहरणाचा गुन्हा दाखल असलेल्या सुप्रीम कॉलनीतील संजना दिलीप साळुंखे या आठ वर्षीय चिमुरडीचा मृतदेह बुधवारी सकाळी पिंप्राळा शिवारातील विहिरीत आढळून आला आहे, त्यामुळे या प्रकरणाला आता कलाटणी मिळाली असली तरी मुख्य कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशनला या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल आहे, तर रामानंदला अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे, एमआयडीसीच्या गुन्ात खुनाचे कलम वाढण्याची शक्यता आहे.एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल गुन्ात संशयित आरोपी समाधान लोटन बडगुजर (रा.पिंपळकोठा ता.एरंडोल) याला अटक करण्यात आलेली आहे, मात्र आपण मुलीचे अपहरण केले नसल्याच्याच कारणावर अद्याप ठाम आहे, त्यामुळे खरे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.लस्सी पाजण्याच्या नावाखाली बडगुजर हा संजना तिचा भाऊ विकी, जितू व बहीण कोमल आदी जणांना घेवून गेला होता. नंतर संजना वगळता या तिघांना गुजराल पेट्रोल पंपाजवळून एका रिक्षात बसवून सुप्रीम कॉलनीत रवाना केले होते. त्यानंतर संजना व बडगुजर गायब झाल्याची तक्रार मुलीच्या आईने दिल्यावरुन पोलिसांनी बडगुजरविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. विद्युत पंप सुरू करताना आढळला मृतदेहपिंप्राळा शिवारातील संत मिराबाई नगरात अनिल भिमसिंग पाटील यांच्या मालकीची विहीर आहे. त्याचा विद्युत पंप सुरू करण्यासाठी पाटील हे सकाळी आठ वाजता शेतात गेले असता विहिरीजवळ दुर्घंधी येत होती. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता एका मुलीचा मृतदेह त्यात दिसून आला. त्यांनी ही माहिती पोलीस पाटलाच्या माध्यमातून रामानंद नगर पोलिसांना कळविली.पोलिसांची दमछाकघटनेची माहिती मिळाल्यानंतर उपनिरीक्षक नरवाडे, प्रदीप चौधरी, शरद पाटील आदींनी घटनास्थळ गाठले. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याने पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले यांनी तेथील निरीक्षक सुनील कुराडे यांच्याशी संपर्क साधून मृतदेहाबाबत माहिती दिली. कुराडे यांनी याच गुन्ाच्या तपासासाठी एरंडोलला असलेले सहायक निरीक्षक सचिन बागुल व रामकृष्ण पाटील यांना व्हॉटस्ॲप फोटो पाठवून मृतदेहाबाबत कळविले. त्यांनी तेथून माघारी फिरत घटनास्थळ गाठले. त्यांनीही हे फोटो मुलीचे मामा व आईला दाखविले.