कर्नाटक विधान परिषद उपसभापतींची आत्महत्या; रेल्वे रुळावर सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 07:56 AM2020-12-29T07:56:59+5:302020-12-29T07:57:44+5:30
SL Dharmegowda, Deputy Speaker of State Legislative Council : रेल्वे रुळावर धर्मगौडा यांचा मृतदेह आढळून आला आहे.
नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती आणि जेडीएस नेते एसएल धर्मगौडा (SL Dharmegowda) यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रेल्वे रुळावर धर्मगौडा यांचा मृतदेह आढळून आला आहे. तसेच घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिक्कामगलुरुच्या कडुर येथील रेल्वे रुळावर एसएल धर्मगौडा यांचा मृतदेह मिळाला आहे. तसेच त्याठिकाणी पोलिसांना एक सुसाईट नोटही सापडली आहे. माजी पंतप्रधान आणि जेडीएस नेते एच डी देवेगौडा यांनी देखील या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती एसएल धर्मगौडा यांची आत्महत्या ही अत्यंत धक्कादायक घटना असल्याचं म्हटलं आहे. तसेच धर्मगौडा हे अतिशय सभ्य आणि शांत व्यक्ती होते असं एच डी देवेगौडा यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Karnataka: Body of SL Dharmegowda, Deputy Speaker of State Legislative Council was found on a railway track near Kadur in Chikkamagaluru. A suicide note has been recovered.
— ANI (@ANI) December 29, 2020
It is shocking to learn the news of Deputy Speaker of State Legislative Council and JDS leader SL Dharmegowda's suicide. He was a calm and decent man. This is a loss of the state: HD Deve Gowda, former PM and JDS leader (File pic) https://t.co/3NHL9rJElzpic.twitter.com/BtdaLzjtwF
— ANI (@ANI) December 29, 2020