अमेरिकेकडून घेणार बोफोर्सच्या तोफा
By Admin | Published: November 18, 2016 01:10 AM2016-11-18T01:10:32+5:302016-11-18T01:10:32+5:30
३० वर्षांनंतर आता भारतीय लष्करात अमेरिकन बनावटीच्या हॉवित्झरचा तोफांचा समावेश केला जाणार आहे.
नवी दिल्ली : स्व. राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात बोफोर्स तोफा तिच्या उपयुक्ततेपेक्षा खरेदीतील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे जास्त चर्चेत राहिल्या. बोफोर्स म्हणजे भ्रष्टाचार असेच अनेक वर्षे समीकरण बनले होते. मात्र ३० वर्षांनंतर आता भारतीय लष्करात अमेरिकन बनावटीच्या हॉवित्झरचा तोफांचा समावेश केला जाणार आहे.
एम-७७७ हॉवित्झर तोफांची निर्मिती बीएई सिस्टीम या अमेरिकन कंपनीने केली आहे. बोफोर्स तोफाची
निर्मिती करणारी स्विडीश कंपनी
आता बीएईच्या नियंत्रणाखाली आहे. पुढील वर्षी जून महिन्याच्या मध्यावर लष्कराच्या ताफ्यात पहिली १५५ एमएम हॉवित्झर तोफ दाखल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १४५ एम-७७७ हॉवित्झर तोफांच्या खरेदी व्यवहाराला मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा व्यवहार ५ हजार कोटी रुपयांचा आहे.त्यासाठी पेंटागॉनचे पत्र भारताला मिळाले आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन आठवडयांमध्ये यासंबंधी करार होण्याची शक्यता आहे. भारतात महिंद्रा कंपनी ही बीएईची व्यावसायिक भागीदार असणार आहे. करार झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात दोन होवित्झर तोफा दिल्या जातील. त्यानंतर दर महिन्याला दोन तोफा मिळतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)