बोफोर्स तोफा पुन्हा दणाणल्या!

By admin | Published: July 16, 2017 11:45 PM2017-07-16T23:45:04+5:302017-07-16T23:45:04+5:30

बोफोर्स तोफांच्या खरेदीमधील कथित घोेटाळ््याचा ३० वर्षांपूर्वी उठलेला वाद मागे ठेवून अमेरिकेकडून घेतलेल्या तशाच प्रकारच्या

Bofors guns again! | बोफोर्स तोफा पुन्हा दणाणल्या!

बोफोर्स तोफा पुन्हा दणाणल्या!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : बोफोर्स तोफांच्या खरेदीमधील कथित घोेटाळ््याचा ३० वर्षांपूर्वी उठलेला वाद मागे ठेवून अमेरिकेकडून घेतलेल्या तशाच प्रकारच्या लांब पल्ल्याच्या व वजनाने हलक्या अशा दोन हॉवित्झर तोफांची चाचणी बारतीय लष्कराने राजस्थानमध्ये पोखरण येथे सुरु केली आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘एम-७७७ ए-२’ मॉडेलच्या या नव्या तोफा चाचणीनंतर प्रामुख्याने चीनच्या सीमेवर तैनात केल्या जाणे अपेक्षित आहे.
१५५ मिमि व्यासाच्या व ३९ कॅलिबरच्या तोफांमध्ये भारतीय बनावटीचा दारुगोळा वापरण्यात येत आहे. तोफगोळ््याच्या माऱ्याची हवेतून जाण्याची दिशा, त्यांचा वेग आणि तोफगोळे किती जलदगतीने सोडले जाऊ शकतात याचा अभ्यास करून परिमाणे ठरविण्यासाठी या चाचण्या प्रामुख्याने घेतल्या जात आहेत.
एका वरिष्ठ लष्करी अधिकारयाने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, सप्टेंबरपर्यंत या चाचण्या सुरु राहतील. त्यानंतर या तोफांच्या ‘फायरिंग टेबल’ची आखणी केली जाईल. नव्या तोफा प्रत्यक्ष लष्करी सेवेत दाखल करून घेण्याच्या प्रक्रियेतील हा एक महत्वाचा भाग असतो.
सीमेवरील झापाट्याने बदलत असलेले सुरक्षाविषय चित्र पाहता लष्कराला या नव्या तोपांची नितांत गरज आहे. त्यामुळेच या तोफा लष्करात दाखल होण्यास विलंब होऊ नये यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत, असे सांगून हा अधिकारी म्हणाला की, सध्या घेण्यात येत असलेल्या चाचण्या सुरळितपणे सुरु आहेत व ‘फायरिंग टेबल’ तयार करण्याच्या दृष्टीने आवश्यक अशी सर्व तांत्रिक माहिती त्यातून नोंदविली जात आहे.
याआधी सन १९८० च्या दशकाच्या मध्यात भारताने स्वीडनच्या बोफोर्स कंपनीकडून हॉवित्झर तोफा घेतल्या होत्या व त्या त्याच नावाने ओळखल्या गेल्या. त्या खरेदीत दलाली दिली गेल्याचे झालेले आरोप व त्यातून उठललेले राजकीय वादळ यामुळे लष्कराची आर्टिलरी तोफांची खरेदी बराच काळ थंड्या बस्त्यात पडली होती.
१४५ नव्या तोफा घेणार, ५,००० कोटी रुपये खर्च अपेक्षित -
गेल्या नोव्हेंबरमध्ये भारत व अमेरिका यांच्यात सरकारी पातळीवर झालेल्या करारानुसार लष्करासाठी एकूण १४५ हॉवित्झर तोफा खरेदी केल्या जाणार आहेत.
यासाठी सुमारे ५,००० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
२५ तोफा पूर्णपणे तयार स्वरूपात आयात केल्या जातील. बाकीच्या तोफांचे अमेरिकेची बीएई सिस्टिम्स व महिंद्र डिफेन्स या कंपन्यांच्या संयुक्त प्रकल्पातून देशातच उत्पादन केले जाईल.
मार्च २०१९ पासून दर महिन्याला पाच या प्रमाणे या नव्या तोफा लष्करात दाखल करून घेतल्या जातील.
सन २०२१च्या मध्यापर्यंत सर्व तोफा मिळतील व त्या लष्करात दाखल होतील.

Web Title: Bofors guns again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.