बोगदे, सुरुंग शोधणारे उपकरण येणार
By admin | Published: January 20, 2017 06:04 AM2017-01-20T06:04:37+5:302017-01-20T06:04:37+5:30
अमली पदार्थांच्या तस्करीसाठी होत असलेल्या बोगद्यांना शोधण्यासाठीच्या उपायांवर इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे (आयआयटी) विद्यार्थी काम करीत आहेत.
बंगळुरू : पाकिस्तानातून अतिरेकी, दहशतवाद्यांना भारतात पाठवण्यासाठी तसेच अमली पदार्थांच्या तस्करीसाठी होत असलेल्या बोगद्यांना शोधण्यासाठीच्या उपायांवर इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे (आयआयटी) विद्यार्थी काम करीत आहेत.
काश्मीरमध्ये सांभा येथे अतिरेकी हल्ला झाल्यानंतर ३० नोव्हेंबर २०१६ रोजी सीमा सुरक्षा दलाने सीमेपलीकडून बोगदा तयार केल्याचे आम्हाला आढळल्याचे सांगितले. याच बोगद्यातून अतिरेकी घुसल्याचे दिसते. पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आधी चार वर्षे (जुलै २०१२) लष्कराला २० फूट खोल बोगदा आढळला होता. त्यात चांगली हवा खेळती राहील आणि श्वास घ्यायला त्रास होणार नाही, अशी व्यवस्था होती. हा बोगदा आंतरराष्ट्रीय सीमेपासून सांबा विभागात पठाणकोट हवाई तळापासून अवघ्या ५८ किलोमीटरवर भारतात ३४० मीटरवर होता. २००१ ते २०१६ या दरम्यान भारताने पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेपासून निघणारे किमान आठ बोगदे शोधले. ती सरासरी दर दोन वर्षांनी एक अशी होती. यातील एकमेव बोगदा हा अमलीपदार्थांच्या तस्करीसाठी खोदण्यात आला होता इतर बोगदे हे अतिरेक्यांनी घुसखोरी करण्यासाठी किंवा त्याच्याशी संबंधित होते. (वृत्तसंस्था)
>इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी-बीमध्ये असलेल्या नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स इन टेक्नॉलॉजी फॉर इंटर्नल सिक्युरिटीने ग्राऊंड पेनेट्रेटिंग रडार (जीपीआर) विकसित केले आहे. या तंत्रामुळे केवळ बोगदेच शोधता येतील, असे नाही तर जमिनीत पुरून ठेवलेले सुरुंगही सापडता येतील.