१० लाखांची लाच देऊन बोगस एनओसी

By admin | Published: May 5, 2015 01:21 AM2015-05-05T01:21:37+5:302015-05-05T01:21:37+5:30

प्रसन्न घोडगेंचा कारनामा : ड्राफ्ट्समन रॉबर्ट गोन्साल्वीसची साथ

Bogos NOC with a bribe of 10 lakhs | १० लाखांची लाच देऊन बोगस एनओसी

१० लाखांची लाच देऊन बोगस एनओसी

Next
रसन्न घोडगेंचा कारनामा : ड्राफ्ट्समन रॉबर्ट गोन्साल्वीसची साथ

पुरवणी आरोपपत्रातून खुलासा

वासुदेव पागी/पणजी : खाण व्यावसायिक प्रसन्न घोडगे यांनी १० लाख रुपयांची लाच देऊन खनिज निर्यातीसाठी बोगस एनओसी मिळविल्याचे उघड झाले आहे. ही बोगस एनओसी खाण खात्याचे ड्राफ्ट्समन रॉबर्ट गोन्साल्वीस यांनी बनविली होती. फ्रॉस्ट इंटरनॅशनल प्रकरणात एसआयटीकडून दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्रात याचा उल्लेख करण्यात आला आहे.
फ्रॉस्ट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आलेल्या बोगस एनओसी प्रकरणातील खरे मास्टरमाइंड प्रसन्न घोडगे आणि खाण खात्याचे ड्राफ्ट्समन रॉबर्ट गोन्साल्वीस हेच आहेत. गोन्साल्वीस यांनी १० लाख रुपये लाच घेऊन ही बोगस एनओसी बनविली होती आणि घोडगे यांनी गोन्साल्वीसला १० लाख रुपये रोख रक्कम दिली होती. या व्यवहाराची साक्ष देणारे साक्षीदारही एसआयटीने मिळविले आहेत आणि त्यांच्या साक्षी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर झालेल्याही आहेत. एसआयटीतर्फे पणजी भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयात (सत्र न्यायालयात) या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. चार दिवसांपूर्वी दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात या व्यवहारांचा उल्लेख करण्यात आला आहे.
प्रसन्न घोडगे यांच्या पी. व्ही. जी. एक्स्पोर्ट्स कंपनीकडून फ्रॉस्ट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या निर्यातदार कंपनीला १.३५ लाख मेट्रिक टन लोहखनिजाची विक्री करण्यात आली होती. या खनिजाची किंमत १७ कोटी रुपये एवढी होती. या खनिजाची निर्यात करण्यासाठी खाण खात्याचा आवश्यक ना हरकत दाखला न घेताच खनिज बार्जमध्ये चढविण्यात आले होते. ना हरकत दाखल्यासाठी त्यानंतर अर्ज करण्यात आला होता. कायद्याप्रमाणे या खनिजाला एनओसी देता येणार नाही आणि पूर्ण प्रक्रिया करून एनओसी मिळेपर्यंत किमान १ महिना लोटला जाईल, असे त्यांना सांगण्यात आले. परंतु पणजी जेटीजवळ बार्ज ठेवण्यासाठी कॅप्टन ऑफ पोर्टला दर दिवशी १० लाख रुपये भाडे आकारावे लागत होते. त्यामुळे एक महिना थांबले, तर ३ कोटी रुपये रक्कम कॅप्टन ऑफ पोर्टला द्यावी लागणार होती. खनिजाची विक्री घोडगे यांनी केल्यामुळे कायद्यानुसार त्यांनाच ते पैसे भरावे लागणार होते. त्यामुळे घोडगे यांनी हे बोगस एनओसीचे कारस्थान रचले.

Web Title: Bogos NOC with a bribe of 10 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.