बोगस बियाणे प्रकरणात चार केंद्रांचे परवाने रद्द करणार

By Admin | Published: June 12, 2016 10:33 PM2016-06-12T22:33:49+5:302016-06-12T22:33:49+5:30

जळगाव : कपाशीच्या देशी सुधारित बोगस बियाण्याच्या विक्री प्रकरणात चार कृषि केंद्रांची नावे समोर आली आहेत. या केंद्रांना नोटिसा बजावून सुनावणीअंती त्यांचे विक्री परवाने रद्द करण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेच्या कृषि विभागातर्फे केली जाणार आहे.

In the bogus seed case, four centers can be canceled | बोगस बियाणे प्रकरणात चार केंद्रांचे परवाने रद्द करणार

बोगस बियाणे प्रकरणात चार केंद्रांचे परवाने रद्द करणार

googlenewsNext
गाव : कपाशीच्या देशी सुधारित बोगस बियाण्याच्या विक्री प्रकरणात चार कृषि केंद्रांची नावे समोर आली आहेत. या केंद्रांना नोटिसा बजावून सुनावणीअंती त्यांचे विक्री परवाने रद्द करण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेच्या कृषि विभागातर्फे केली जाणार आहे.
भुसावळात स्वदेशी५ च्या बोगस बियाणे विक्री प्रकरणात कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा कृषि अधिकारी सुरेंद्र पाटील, मोहीम अधिकारी प्रदीप ठाकरे व इतरांच्या पथकाने गिरीश चौधरी नामक व्यक्तीला पकडले आहे. तो सध्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कोठडीत असून, त्याची चौकशी केली जात आहे. त्याने या चौकशीत आपण पहूर, फत्तेपूर, शेंदूर्णी, जामनेर येथील कृषि केंद्रांवर बोगस कपाशीचे बियाणे दिल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार या केंद्रांची माहिती घेण्यात आली असून, या केंद्रांना जि.प.चा कृषि विभाग नोटिसा देणार आहे. त्यांची सुनावणी घेतल्यानंतर परवाने रद्द केले जाणार असल्याची माहिती कृषि विकास अधिकारी चौधरी यांनी दिली. या प्रकरणात आणखी काही कृषि केंद्रांची नावे पुढे येत आहेत. त्यांनाही नोटिसा बजावल्या जाणार आहेत.

रविवारीही रचला सापळा
जिल्ह्यात अजूनही स्वदेशी-५ व अंबिका १२ या देशी सुधारित कपाशी बियाण्याच्या काळाबाजाराची कुरबूर, तक्रार येत आहे. ही बाब लक्षात घेता रविवारी सु˜ी असतानाही जि.प.च्या कृषि अधिकार्‍यांनी जिल्ह्यात सापळे लावले. चार तास काही अधिकारी शिरपूरनजीकच्या एका तालुक्यात थांबून होते, परंतु त्यांना अपयश आले.

बीटीच्या किमती ७०० रुपयांवर
बीटी (बोलगार्ड २) प्रकारच्या कपाशी बियाण्याच्या पाकिटांचा दर घसरला आहे. ७५० ते ७२० रुपये दरात बीटी कपाशीच्या बियाण्याची विक्री सुरू होती. परंतु पावसाळा लांबणीवर पडत असल्याचे लक्षात घेता बियाणे खरेदीस शेतकर्‍यांचा फारसा प्रतिसाद नाही. कोरडवाहू क्षेत्रात येणार्‍या बीटी कपाशीच्या वाणांची मागणी घसरली आहे. तर बागायती कपाशी लागवड सध्या थांबल्याने दरात घसरण झाली आहे.


Web Title: In the bogus seed case, four centers can be canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.