वडोदरामध्ये केमिकल फॅक्‍टरीत भीषण स्फोटानंतर आग, 4 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 03:30 PM2021-12-24T15:30:26+5:302021-12-24T15:33:12+5:30

स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, आजूबाजूच्या घरांच्या काचा फुटल्या आणि घरांना तडेही गेले.

boiler blast in Vadodara chemical factory, Fire kills 4, injures 10 | वडोदरामध्ये केमिकल फॅक्‍टरीत भीषण स्फोटानंतर आग, 4 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी

वडोदरामध्ये केमिकल फॅक्‍टरीत भीषण स्फोटानंतर आग, 4 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी

Next

वडोदरा:गुजरातमधील वडोदरामध्ये कॅंटन लॅबोरेटरीज कंपनीच्या बॉयलरचा स्फोट होऊन 4 कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत अनेकजण गंभीर जखमीही झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बॉयलरच्या स्फोट झाल्यानंतर भीषण आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाही. सध्या पोलिस याचा अधिक तपास करत आहेत.

स्फोटाच्या आवाजामुळे घरांना तडे

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या वडोदराजवळील वडसर ब्रिज परिसरातील कँटन लॅबोरेटरीज केमिकल फॅक्टरीत बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर परिसरात भीषण आग लागली. या दुर्घटनेत चार मजुरांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी असल्याची माहिती आहे. दरम्यान, स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की,  आजूबाजूच्या घरांच्या काचा फुटल्या आणि घरांना तडेही गेले.

भूकंप झाल्यासारखे वाटले

वडोदरा गुजरात इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट एरियामध्ये असलेल्या कँटन लॅबोरेटरी कंपनीच्या बॉयलरचा शुक्रवारी अचानक स्फोट झाला. स्फोटाचा आवाज आजूबाजूच्या लोकांना ऐकू आल्यावर रेल्वेचा अपघात किंवा भूकंप झाल्यासारखे वाटले. घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलीस मदत आणि बचाव कार्यात गुंतले असून घटनेच्या कारणाचाही शोध घेतला जात आहे.

पीडित कुटुंबांची नुकसान भरपाईची मागणी

पीडित कुटुंबीयांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. सुरक्षा साधनांच्या अभावामुळे ही दुर्घटना घडल्याचे लोकांचे म्हणणे आहे. सुरक्षेसाठी या कारखान्यात कोणतेही साधन उपलब्ध नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या पंचमहालच्या गोघंबा येथे असलेल्या एका रासायनिक कारखान्यालाही स्फोटानंतर आग लागली होती, ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता, तर 15 जण गंभीर जखमी झाले होते. हा स्फोटही इतका जोरदार होता की त्याचा आवाज अनेक किलोमीटर दूर ऐकू आला.
 

Web Title: boiler blast in Vadodara chemical factory, Fire kills 4, injures 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.