११७३ जणांच्या कामाचा २०९ महिलांंवर बोजा सफाई मजदूर संघ : महिला हक्क समितीकडे तक्रार
By admin | Published: November 3, 2015 11:45 PM2015-11-03T23:45:33+5:302015-11-03T23:45:33+5:30
जळगाव : मनपातील महिला सफाई कर्मचार्यांवर अन्याय होत असून २०९ महिला सफाई कर्मचारी असताना त्यांच्यावर ११७३ कामगारांच्या कामाचा बोजा टाकला जात असल्याची तक्रार अखिल भारतीय सफाई मजदूर संघाने महिला हक्क व कल्याण समितीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Next
ज गाव : मनपातील महिला सफाई कर्मचार्यांवर अन्याय होत असून २०९ महिला सफाई कर्मचारी असताना त्यांच्यावर ११७३ कामगारांच्या कामाचा बोजा टाकला जात असल्याची तक्रार अखिल भारतीय सफाई मजदूर संघाने महिला हक्क व कल्याण समितीकडे निवेदनाद्वारे केली आहे. महिला सफाई कामगारांना शासन परिपत्रकाप्रमाणे काम मोजून दिले जात नाही. त्यामुळे त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत आहे. त्याबाबतही संबंधीतांना आदेश द्यावेत. तसेच शासन आदेशानुसार सफाई कामगारांना शासकीय सुटया देणे बंधनकारक असताना या कर्मचार्यांवर अधिकारी दबाव टाकून सुट्या देत नाहीत. अतिरिक्त काम करून घेतात. ही बाब योग्य नाही. या अधिकार्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणीही निवेदनात केली आहे.