वरुण गांधींच्या 'देशद्रोह' ट्विटवर कंगना रणौतचा पलटवार; म्हणाली - 'जा और रो अब'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 07:42 PM2021-11-11T19:42:25+5:302021-11-11T19:48:37+5:30

कंगना रणौत पुन्हा एकदा तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. देशाला स्वातंत्र्य भिकेत मिळाले, या तिच्या वक्तव्यावर वरुण गांधी यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली होती.

Bollywood actress kangana ranaut reacts on varun gandhi tweet says india got freedom in gandhi's begging bowl | वरुण गांधींच्या 'देशद्रोह' ट्विटवर कंगना रणौतचा पलटवार; म्हणाली - 'जा और रो अब'

वरुण गांधींच्या 'देशद्रोह' ट्विटवर कंगना रणौतचा पलटवार; म्हणाली - 'जा और रो अब'

Next

कंगना रणौतने (Kangana Ranaut) देशाच्या स्वातंत्र्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन आता वाद आणखीनच वाढत चालला आहे. भिकेत स्वातंत्र्य मिळाल्याच्या त्यांच्या वक्तव्यावर वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी ट्विट करत निशाणा साधला होता. आता कंगनाने यावर पलटवार केला आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर वरुण गांधींचे ट्विट पोस्ट करत राग व्यक्त केला आहे. यावर तिने लिहिले आहे की, गांधींना स्वातंत्र्य भिकेत मिळाले होते. जा आता आणखी रडा. कंगनाच्या या वक्तव्याने अनेक लोक दुखावले गेले आहेत. तिचे नाव ट्विटरवर ट्रेंड करत आहे. (Kangana Ranaut reacts on Varun Gandhi tweet)

कंगनानं व्यक्त केला राग -
कंगना रणौत पुन्हा एकदा तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. देशाला स्वातंत्र्य भिकेत मिळाले, या तिच्या वक्तव्यावर वरुण गांधी यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली होती. वरुण यांचे हे ट्विट कंगनाने इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले, 'मी स्पष्टपणे बोलले होते, की 1857 ची क्रांती नियंत्रित करण्यात आली होती. यामुळे ब्रिटीश शासनाकडून अधिक अत्याचार आणि क्रूरता केली गेली आणि जवळपास शतकानंतर आपल्याला स्वातंत्र्य दिले गेले, तिही गांधींच्या भिकेत. जा आता आणखी रडा.'

काय म्हणाली होती कंगना -
टाईम्स नाऊ समिटमध्ये बोलताना कंगना रणौत म्हणाली होती, काँग्रेसचे राज्य हे ब्रिटीश राजवटीचेच एक पुढचे रूप होते आणि देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले. तिचा इशारा नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याकडे होता. एवढेच नाही, तर 1947 मध्ये देशाला भिकेत स्वातंत्र्य मिळाले, असेही तिने म्हटले होते.

वरुण गांधींनी केले होते असे ट्विट -
कधी महात्मा गांधीजींचा त्याग आणि तपश्चर्येचा अपमान, कधी त्यांची हत्या करणाऱ्यांचा सन्मान आणि आता शहीद मंगल पांडेंपासून ते राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार. या विचारधारेला मी वेडेपणा म्हणू की देशद्रोह? अशा शब्दात वरुण गांधी यांनी कंगनाविरुद्ध संताप व्यक्त केला होता. 

आणखी वाचा - 

याला वेडेपणा म्हणू की देशद्रोह, कंगना रणौतच्या विधानावर संतापले गांधी

ती भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं, कंगनाचा व्हिडिओ व्हायरल

 


 

Web Title: Bollywood actress kangana ranaut reacts on varun gandhi tweet says india got freedom in gandhi's begging bowl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.