'या' बॉलीवूड डायरेक्टरने भाजप नेते मुरली मनोहर जोशींना म्हटले, देशद्रोही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 11:16 AM2020-01-10T11:16:43+5:302020-01-10T11:55:03+5:30
अनुराग कश्यप यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच मुरली मनोहर जोशींना देशद्रोही म्हणून टाकले. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली - माजी केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू एम. जगदीश कुमार यांना हटविण्याची मागणी केली. यानंतर बॉलिवूड डायरेक्टर अनुराग कश्यप चांगलेच भडकले असून त्यांनी जोशी यांना देशद्रोही संबोधले. अनुरागने या संदर्भात ट्विट केले असून ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीवरून अनेक कलाकारांनी निषेध नोंदविला. त्यातच भाजप नेत्याने कुलगुरूंना हटविण्याची मागणी केली. त्यानंतर अनुराग कश्यप यांनी जोशी यांना देशद्रोही संबोधलं. तसेच जोशी यांना पाकिस्तानात पाठवून देण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
विद्यार्थ्यांची फी वाढीसंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारचा प्रस्ताव लागू करण्यासाठी कुलगुरू तयार नसणे ही हैराण करणारी गोष्ट असल्याचे सांगत जोशी यांनी कुलगुरूंचे हे कृत्य निंदणीय असून त्यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी केली.
— Murli Manohar Joshi (@drmmjoshibjp) January 9, 2020
यावर अनुराग कश्यप यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच मुरली मनोहर जोशींना देशद्रोही म्हणून टाकले. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.