"द बेस्ट ऑस्कर एव्हर" म्हणत, राम गोपाल वर्मांनी उडवली PM मोदींची खिल्ली, Video शेअर करत साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 10:35 IST2021-05-23T10:35:26+5:302021-05-23T10:35:47+5:30
मोदींची खिल्ली उडवताना, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ऑस्कर सोहळ्यातील एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे.

"द बेस्ट ऑस्कर एव्हर" म्हणत, राम गोपाल वर्मांनी उडवली PM मोदींची खिल्ली, Video शेअर करत साधला निशाणा
मुंबई - बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) सध्या चित्रपटांपेक्षा वादग्रस्त वक्तव्यांमुळेच अधिक चर्चेत राहत आहेत. देशात घडणाऱ्या अनेक घटनांवर ते प्रतिक्रिया देताना दिसतात. यावेळी त्यांनी एक मॉर्फ व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) खिल्ली उडवली आहे. (bollywood director ram gopal varma share video about pm narendra modi)
मोदींची खिल्ली उडवताना, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ऑस्कर सोहळ्यातील एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. हा एक एडिटेड मॉर्फ व्हिडिओ आहे. या व्हिडिओत अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स ऑस्कर विजेत्याचे नाव घोषित करत असते. यावेळी मोदींच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधील भावूक भाषणाची झलक दाखवण्यात आली आहे आणि त्यानंतर तो ऑस्कर पुरस्कार मोदींनाच मिळतो, असे दाखवण्यात आले आहे. या व्हिडिओच्या शेवटी अभिनेत्री जेनिफर "अँड ऑस्कर गोज टू", असे म्हणते आणि त्यानंतर स्क्रिनवर ऑस्कर पुरस्कार घेतलेले 'एडिटेड' मोदी दिसतात आणि सभागृहातील लोक टाळ्या वाजवतात.
THE BEST OSCAR EVER🙏🙏🙏 pic.twitter.com/KRfD0UTlrb
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) May 22, 2021
भाजपचं ठरलंय! दिल्लीतून सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र; नेतृत्त्वानं घेतला महत्त्वाचा निर्णय
वाराणसीतील डॉक्टरांशी बोलताना भावूक झाले होते मोदी -
पंतप्रधान मोदी कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरातील जिल्हाधिकारी, डॉक्टर्स, पॅरामेडीकल स्टाफ आणि फ्रंटलाईन वर्कर्सं यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगच्या माध्यमाने संवाद साधत आहेत. याच एक भाग म्हणून मोदींनी शुक्रवारी वाराणसीतील जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्कर्संशी संवाद साधला. यावेळी, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल बोलताना मोदी भावूक झाले होते.
पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधील डॉक्टरांशी बोलताना प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच, कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले. मात्र, कोविडच्या लढाईत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचा उल्लेख करताना मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाच्या लढाईत आपण अनेक आप्तेष्ठांना गमावले आहे. मी काशीचा एक सेवक असून काशीतील प्रत्येकाचे आभार मानतो. विशेषत: डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य सेवकांनी जे काम केले, ते कौतुकास्पद आहे. या महामारीने आपल्या जवळील माणसे नेली आहेत. त्या सर्वांना मी श्रद्धांजली वाहतो, त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असे म्हणत मोदी भाऊक झाले होते.
मोदी सरकारचा मोठा निर्णय! 1.5 कोटी कामगारांना थेट लाभ, हाती जास्त पैसे येणार