"सुकेशला भेटण्यासाठी तिहारला BMW मधून जायचे, भेटीसाठी १.५ लाख रुपये मिळायचे"; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 05:47 PM2023-01-20T17:47:25+5:302023-01-20T17:48:55+5:30
सुकेश चंद्रशेखर याच्या खंडणी प्रकरणात अडचणी वाढल्या आहेत. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही या दोन्ही अभिनेत्रींनी जबाब नोंदवून खुलासा केला आहे.
सुकेश चंद्रशेखर याच्या खंडणी प्रकरणात अडचणी वाढल्या आहेत. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही या दोन्ही अभिनेत्रींनी जबाब नोंदवून खुलासा केला आहे. या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसही अडचणीत सापडली आहे. जॅकलिन व्यतिरिक्त आणखी एक अभिनेत्री आहे जी सुकेश चंद्रशेखरमुळे कायदेशीर अडचणीत अडकली आहे आणि ती आहे नोरा फतेही. या दोन अभिनेत्रींशिवाय आणखी एक अभिनेत्री अडचणीत सापडली आहे. ही अभिनेत्री सुकेशला भेटण्यासाठी अनेकदा तिहार तुरुंगात गेली आहे. या प्रकरणात आणखी नवे खुलासे आले आहेत.
दिल्लीपोलिसांनी दाखल केलेल्या 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात अनेक दावे केले आहेत. एप्रिल-मे 2018 मध्ये सुकेशला भेटण्यासाठी तीन अभिनेत्री/मॉडेल तिहार तुरुंगात पोहोचल्या होत्या. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात या तिन्ही अभिनेत्रींनी पोलिसांनी केलेल्या चौकशीत सुकेशशी संबंधित सर्व गुपिते उघड केल्याचे म्हटले आहे. 'सुकेशने तिहार तुरुंगातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना लाच देऊन त्यांना बोलावून घेतले होते, असं यात म्हटले आहे.
'गदर 2', सकीना आणि तारा सिंगला केलं मालामाल, जाणून घ्या संपूर्ण स्टारकास्टचं मानधन
तुरुंगात असतानाही सुकेश चंद्रशेखर ऐशमध्ये जीवन जगत होता असं दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. 'या अभिनेत्री सुकेशला भेटण्यासाठी 1 ते 1.5 लाख रुपये घेत असत आणि 45 मिनिटे ते 1 तास भेटत असत. इतकंच नाही तर जेव्हा एखादी अभिनेत्री सुकेशला भेटायला यायची तेव्हा तिला एक खास खोली दिली जायची, तिथे टीव्ही, फ्रीज आणि एसीची व्यवस्था केली जायची. येथे तो अभिनेत्रींना भेटत असे, दिल्ली पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे. मात्र, या तिसऱ्या अभिनेत्रीचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
या सर्व गोष्टी या अभिनेत्रींनीच चौकशीदरम्यान सांगितल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. सुकेशला भेटण्यासाठी तिहारला जायचे होते, तेव्हा एक बीएमडब्ल्यू कार त्यांना घेण्यासाठी यायची, जी तीन क्रमांकाच्या गेटमधून तुरुंगात जायची. या प्रकरणी तिहार तुरुंगाचे माजी महासंचालक संदीप गोयल यांना निलंबित करण्यात आले आहे, असंही पोलिसांनी म्हटले आहे.