बीफ खाल्ले म्हणून बोल्टने नऊ सुवर्णपदके मिळवली - भाजप खासदार

By admin | Published: August 29, 2016 11:59 AM2016-08-29T11:59:08+5:302016-08-29T12:09:13+5:30

जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट गरीब होता. त्याला त्याच्या प्रशिक्षकाने दोन वेळा बीफ खाण्याचा सल्ला दिला.

Bolt won nine gold medals as beef eaten - BJP MP | बीफ खाल्ले म्हणून बोल्टने नऊ सुवर्णपदके मिळवली - भाजप खासदार

बीफ खाल्ले म्हणून बोल्टने नऊ सुवर्णपदके मिळवली - भाजप खासदार

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २९ - जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट गरीब होता. त्याला त्याच्या प्रशिक्षकाने दोन वेळा बीफ खाण्याचा सल्ला दिला आणि त्यामुळे त्याने ऑलिम्पिकमध्ये ९ सुवर्णपदके मिळवली असे टि्वट भाजप खासदार आणि दलित नेते उदित राज यांनी केले आहे. दिल्लीचे भाजप खासदार उदीत राज यांनी असे टि्वट करुन त्यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. 
 
बीफ हा भाजपासाठी भावनात्मक विषय आहे. भाजपाचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये बीफ बंदीसाठी कठोर कायदे केले जात आहेत. त्याचवेळी उदीत राज यांनी जाहीरपणे बीफ खाण्याचे समर्थन केले आहे. आपल्या टि्वटवरुन वाद होऊ शकतो हे लक्षात येताच उदीत राज यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 
 
 
बोल्टच्या प्रशिक्षकांनी जे म्हटले त्याचाच आपण पुनरुच्चार केला असे उदीत राज यांनी सांगितले. अॅथलिट अडथळयांवर मात करुन पुढे जाऊ शकतो अपयशासाठी त्याने परिस्थितीला जबाबदार धरु नये असे आपल्याला म्हणायचे होते असे राज यांनी सांगितले. समर्पण काय असते ते उसेन बोल्टकडून शिका. पायाभूत सुविधा नाहीत, भ्रष्टाचार आहे अशी कारणे शोधू नका असे उदीत राज म्हणाले. 
 
देशात आज क्रीडापटूंसाठी सुविधांचा अभाव नाही. जमैका, केनिया या देशांच्या तुलनेत सरकार खेळाडूंवर मोठया प्रमाणात पैसा खर्च करते असे उदीत राज म्हणाले. 
 

Web Title: Bolt won nine gold medals as beef eaten - BJP MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.