मॉस्कोहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्बची माहिती, IGI विमानतळावर लँडिंग, तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 09:32 AM2022-10-14T09:32:18+5:302022-10-14T09:37:17+5:30

मॉस्को येथून दिल्लीला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती समोर आली. यानंतर दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर खळबळ उडाली आहे.

Bomb alert on flight from Moscow to Delhi lands at IGI airport | मॉस्कोहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्बची माहिती, IGI विमानतळावर लँडिंग, तपास सुरू

मॉस्कोहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्बची माहिती, IGI विमानतळावर लँडिंग, तपास सुरू

Next

नवी दिल्ली: मॉस्को येथून दिल्लीला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती समोर आली. यानंतर दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर खळबळ उडाली आहे. विमानाच्या लँडिंगपासून प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून रात्री सव्वा अकरा वाजता सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. रात्री  ११ वाजून १५ मिनिटांनी ही माहिती मिळाली. 

मिळालेली माहिती अशी, रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी  एका आला, यात आज रात्री ३ वाजून २० मिनिटांनी मॉस्कोहून T3 ला येणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्ब आहे, अशी माहिती या फोनवरुन देण्यात आली. यानंतर सर्व यंत्रणा अलर्ट करण्यात आल्या. त्यानंतर बॉम्ब डिस्पोजल स्क्वाड आणि इतर बचाव पथके पाठवण्यात आली, विमान रनवे २९ वर उतरले, आणि विमानाची तपासणी सुरू आहे. 

गुरुवारी रात्री रशियाची राजधानी मॉस्कोहून दिल्लीला येणाऱ्या विमानामध्ये बॉम्ब असल्याची माहिती फोनवरुन मिळाली. या माहितीने एकच खळबळ उडाली. विमानात असलेल्या ३८६ प्रवासी आणि १६ क्रू मेंबर्सनाही बाहेर पाठवण्यात आले.  बॉम्बची माहिती मिळताच संपूर्ण विमानाची तपासणी घेण्यात येत आहे. 

Web Title: Bomb alert on flight from Moscow to Delhi lands at IGI airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.